SONG : He Desh Navache Ghar
Production : Navayan Mahajalsa
Presents : Jalsa Studio
Production Head : Sachin Mali
Lyrics : Sheetal Sathe
Singer : Sheetal Sathe
Music : Marathi Folk Music
Music Arrangements : Aniket Mohite
Rhythem & Indian Percussions :
Rohan Pawar
Yash Kamble
Hamaraj Sonkamble
Aniket Mohite
Melody : Kumar Shahare
Chorus :
Saidas Dhumal
Kushal Shinde
Sachin Mali
Yash Kamble
Aniket Mohite
Recording Studio
Jalsa Recording Studio, Pune
Mix / Master
Gautam Kumar
Video & Edit : Satish Sathe
Gracias : Kiran Shinde
Jalsa Studio Production Team
Krushna Kamble
Abhang Shital Sachin
Kushal Shinde
𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत YouTube Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
sheetal sathe | संविधान गीत | sheetal sathe new song | desh navache ghar | गोंधळ पोवाडा गीत | katha | katha kathan | vinodi katha | gramin katha | guru gorakhnath ki katha | गोंधळ गीत | Babasaheb Deshmukh| Powada| mahesh kothare | Vitthal Umap lokgeet | प्रल्हाद शिंदे | navnath darshan | desh nawacha ghar | लोकप्रिय मराठी लोकगीत | shastra marathi | ,maharashtrachi hasya jatra | Anna bhau Sathe | navayan Mahajalsa | Jalsa Studio | Jalsa फोल Music Academy
LYRICS : DESH NAVACHA GHAR
हे देश नावाचं घर न आपण भाऊ बहीण सुंदर
न राहू सुखा समाधानान जगू बंधू भावानं..
माझ्या देशाची किर्ती न्यारी
डंका वाजे जगाच्या दारी.....
नदी नाले डोंगर कपारी
झाड झुडप खोल ही दरी...
झाडी जंगल हिरवळ
तीही बाजूनी समिंदर
समृद्धीचा दरवळ
निसर्गाची किरपा भरपूर..
जम्मू ते कन्याकुमारी
सीमा दिसती नकाशावरी..
असं या भूमीच वर्णन.. ऐकावं लक्ष देऊन...!! 1!!
आमची निरनिराळी गावं
खानपान अनिक पेहराव
कोसा कोसा वरती बदलतोया
भाषेचा ठेहराव....
मातीचा रंग निराळा..
लाल.. तांबडा.. अन काळा...
तरी मायभुमिचा या मातीचा
प्रत्येकास जिव्हाळा...
ही माया जपून उरी.. पोटाशी कवटाळून धरी..
करावा माणसाचा सन्मान.. जगू बंधुभावान.....!! 2 !!
जर सारे देशबांधव
कस गांवा बाहेर गावं
हा देश जर तुझा माझा
कसा जातीचा भेदभाव
जर आम्ही भारताची लोक...
नसू बंधुभावान एक..
जर आम्ही भारताची लोक
नसू कर्तव्याशी नेक...
असं कस आम्ही नागरीक..
राष्ट्र कसं बनावं.. सांगून गेले जोतीराव..
बनते एकमय लोकांन.. घडाव संविधानान.. !! 3 !!
गेले इंग्रज सोडून
जाता जाता गेले फोडून
दंगलीच पेटवून रान आम्ही
आपसात घेतल झोडून...
असा गुलामितला देश
केला स्वतंत्र लढून..
या हो बलिदानाची आब राखून
सांगते हात जोडून..
जे जे करती इथ निवास न या भूमीवर घेती श्वास
असा गौरवशाली इतिहास जपावा स्वाभिमानान...!! 4 !!
देशात दुसरा एक देश
जातीचा पांघरून वेश
जगतो कुंपण बांधून
त्याच्या हाती गुलामी फास..
जातीचा देश भेसूर
बाईच अडवून दार
कोंडून मारतो फार
हा असा जातीचा जीना
उतरता चढता येईना..
जातीच्या नुसार काम
दर्ज्याच्या नुसार दाम
शिवाशिविचा विटाळ
दलितांच्या माथी कीटाळ
जात घेऊनच जन्मते
आई बाच्या पोटी बाळ...
फडकू द्या असा तिरंगा
नको कुणीच उपाशी नंगा
नको जाती धर्मात दंगा
तहजीब यमुना गंगा...
जात मेली घराघरात.. तर जन्माला येईल भारत न
तोडा जातीच बंधन..न जगू संविधानान....!! 4 !!
गीतकार : शितल साठे