कान्हया रे जगजेठी । देई भेटी एक वेळे ॥१॥ काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥ येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥३॥ तुका म्हणें पाहिलें मागें । एवढ्या वेगें अंतरला ॥४॥