देहाचा पिंजरा झाला जुना
जन्म मीडे ना पुन्हा पुन्हा
नको अभिमान करू
भल्या मानसा
दोन दिवसाची दुनिया
छाती फूगउन चालू नको
या तुझ्या मुखातून
बोल अभद्र बोलू नको रे
संतांचा सज्ज्नाचा
नको अपमान करू
भल्या मानसा
नको अभिमान करू
भल्या मानसा
ही तुझी धन दौलत
बंगला गाड़ी न शेतीवाडी
सारे राहिल येथे
तुझ्या आवडीची मोटर गाड़ी
सत्मार्ग असलेल्या
गरिबांना दान करू
भल्या मानसा
नको अभिमान करू
भल्या मानसा
ही तुझी रे काया
जायीन क्षणात अशी वाया
घे करुन भजन
राम नाम तारेल आता
गणेश सांगे रे
आईक तु रे मानवा
भल्या मानसा
नको अभिमान करू
भल्या मानसा