MENU

Fun & Interesting

दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीनेच काढला कायमचा काटा lमुलीने दिली फिर्याद l डोक्यात घातला रॉड l

VIGHNAHAR TIMES 120,128 lượt xem 6 months ago
Video Not Working? Fix It Now

#विघ्नहरटाइम्स
नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा
पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून पतीचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून मृत झालेल्या इसमाचे नाव देवराम सोमा डुकरे ( वय 54 वर्षे रा.औरंगपूर, ता. जुन्नर जिल्हा पुणे ) असे आहे.
या बाबत समजलेली माहिती अशी की देवराम डुकरे व त्याची पत्नी दीपाली डुकरे आपल्या एका विवाहित मुली सोबत औरंगपूर येथील खंडोबामाळ येथे राहत होते.
देवराम डुकरे व त्याची पत्नी दीपाली यांच्यात नेहमीच भांडणे होत होती.सोमवार (दि. 9 रोजी रात्री 11वाजण्याच्या सुमारास देवराम डुकरे दारूच्या नशेत घरी आला. व पत्नी दीपालीशी जोरजोराने भांडू लागला. 'मला दारू प्यायला पैसे दे' असा तगादा लावला व पत्नीला मारहाण करू लागला.
दररोज होणाऱ्या मारहाणीला त्रासलेल्या पत्नी दीपाली हिने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. रॉडचा घाव वर्मी बसल्याने व जोराचा रक्तश्रव सुरु झाल्याने तो जाग्यावरच कोसळला.
खाली निपचित पडलेली पती उठत का नाही? म्हणून त्याला हालवून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो उठत नसल्याने दीपाली डुकरे हिने गावातील नातेवाईकांना फोन करून कळविले.
पोलिसांना सकाळी सात वाजता खबर देण्यात आल्याने पोलीस घटनास्थळी तातडीने पोहचले व घटनेचा पंचनामा करून नारायणगावच्या ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छदणासाठी पाठविला. नंतर उशीरा औरंगपूर येथे देवराम डुकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान माझी आई दीपाली हिनेच रागाच्या भरात माझे वडील देवराम डुकरे यांच्या डोक्यात रॉड घालून खून केला असल्याची फिर्याद नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली असल्याचे समजते.

Comment