#digimaharastra
ऐतिहासिक पुणे शहराचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे 'पुणे एकेकाळी’ हे कॉफीटेबल बुक आणि स्मरणरम्य दिनदर्शिकेचे प्रकाशन पुण्यात पार पडले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित 'आठवणीतले पुणे' या विशेष मुलाखतीत माझे स्नेही आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्यासह सहभाग घेतला. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या या दिलखुलास मुलाखतीत आमच्या दिलखुलास गप्पा रंगल्या. यावेळी पुण्यातील जुन्या आठवणींमध्ये रमता आले तसेच अनेक किस्से आणि स्मृतीमधील जुन्या घटनांचा पट यानिमित्ताने पुन्हा उलगडता आला.