MENU

Fun & Interesting

सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा - डॉ. नरेंद्र दाभोलकर | Dr. Narendra Dabholkar

Video Not Working? Fix It Now

2010 च्या 26 फेब्रुवारीच्या रात्री 10 वाजता, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचा एम. ए. चा. विद्यार्थी हरेश शेळके याचा फोन आला, "चौकटीबाहेरचे जग या सात दिवसांच्या व्याख्यानमालेतील उद्याचे नियोजित व्याख्याते पोपटराव पवार यांचा निरोप आलाय की, काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकत नाहीत. कार्यक्रमाला तर अनेक विभागांतील विद्यार्थी येणार असल्याने, तुफान गर्दी होणार आहे. तर आता ऐनवेळी असा कोण वक्ता मिळेल, जो आल्यामुळे (झालेला बदल ऐनवेळी कळल्यावर) तरुणाई निराश होणार नाही, गर्दी अजिबात कमी होणार नाही?"

पुणे शहरात वक्त्यांची कमतरता नाही, पण वेळ आणि परिस्थितीचा काही क्षण अंदाज घेऊन त्याला म्हणालो, "एकच हुकुमाचे पान मला दिसते आहे, डॉ. दाभोलकर! ते उद्या सकाळी साताऱ्याहून पुण्यात बसने 11 वाजता येणार आहेत. आल्याबरोबर त्यांना विद्यापीठात घेऊन जाण्याची व्यवस्था करा. मात्र आत्ता लगेच त्यांना फोन करायला तुमचे विभागप्रमुख प्रा. मनोहर जाधव यांना सांगा. डॉक्टरांना फोनवर तुमची अडचण प्रांजळपणे सांगा. कारण त्यांच्यासाठी प्रश्न मान सन्मानाचा नसेल, पण हातातली कामे बाजूला सारून ऐनवेळी आलेले निमंत्रण स्वीकारायला ते तयार होणार नाहीत. शिवाय, तुमच्या विद्यापीठातच इतके वक्ते असताना, इतक्या ऐनवेळी मी कशाला, असे ते म्हणू शकतील."

हरेशने तो निरोप जाधव सरांना दिला, त्यांनी रात्री 11 वाजता डॉ. दाभोलकरांना फोन करून परिस्थिती सांगितली. डॉक्टरांनी प्रश्न विचारला, 'भाषणाला विषय काय घ्यायचा?' जाधव सर म्हणाले, 'सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा.'

दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा मी साधना कार्यालयात आलो तर, विद्यापीठातील भाषण संपवून डॉक्टर साधनात येऊन पुढील कामाला लागले होते… नंतर तीन वर्षांनी डॉक्टरांची हत्त्या झाली. त्यानंतर काही काळाने त्या भाषणाची ऑडिओ फाईल मागवून घेतली आणि तिचे शब्दांकन करवून घेतले, हेच ते भाषण...!

साधना युवा दिवाळी अंक 2016 मध्ये या भाषणाचे शब्दांकन प्रसिद्ध झाले आहे. मात्र त्याचा ऑडिओ अद्याप कुठेही ऐकवला नव्हता. साधना अर्काइव्हचे काम चालू असताना, तो ऑडिओ आमचा सहकारी सुदाम सानप याच्या हाती लागला. उद्या (20 ऑगस्ट 2022) डॉक्टरांचा नववा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने आज तो ऑडिओ इथे प्रसिद्ध करीत आहोत.

डॉक्टरांची कोणतीही ऑडिओ-व्हिडिओ भाषणे ऐकणे हा चैतन्यदायी अनुभव असतो , मात्र हा ऑडिओ आणखी विशेष आहे याची प्रचिती येईल!

- विनोद शिरसाठ,
संपादक - साधना

साधना साप्ताहिकाच्या अर्काइव्हवर हे भाषण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://weeklysadhana.in/view_article/narendra-dabholkar-on-superstition-of-educated-people
- - - - - - - - - - - -
Follow / Subscribe us on:
Website - www.kartavyasadhana.in/
Facebbok - www.facebook.com/kartavyasadhana1/
Instagram - www.instagram.com/kartavya_sadhana/
Telegram Channel - https://t.me/kartavyasadhana

Comment