जेष्ठ इतिहास संकलक अप्पा पराब, वय वर्ष ८०,
या भागात आपण पाहणार आहोत राजगड चा बालेकिल्ला, महादरवाजा आणि बालेकिल्ल्याचे बुरुज, अफझल खानाचे शीर कुठे चिणले, ब्रह्मर्षी चे स्थान, चंद्रकोर तळे , महाराजांचे जलशास्त्र आणि खूप काही
जगदंबे ची आरती, जी अप्पा नेहमी बालेकिल्ल्यात जननी मातेच्या मंदिराजवळ करतात, आरती चे शब्द पुढील प्रमाणे
जय आंबे जगदंबे जय आंबे जगदंबे जय तुळजा माई
शरणागत भक्तावर करून कर आई
दुमदुमवी गीत तुझे दक्खनच्या वारा
हट्टी मरहट्ट्याच्या हृदयी गाभारा
गोदा कृष्णा गाती गंधकित गाथा
मंगलमंदिर सुंदर सह्याद्रीमाथा
कळस तुझा सोन्याचा जय कळसुबाई
जय आंबे जगदंबे जय तुळजा माई ।।
सिंहासन सत्तावीस गडकोटावरती
पायदळी पायतळी मऊ काळी धरती
पांगारे पळसाच्या चवऱ्या तुज वरती
भरलेल्या कणसाच्या पणत्यांच्या ज्योती
भक्तीचे निरांजन, श्रद्धेची समयी
जय आंबे जगदंबे जय तुळजा माई ।।
माथ्यावर रत्नांची करवंदी जाळी
असुरांच्या रक्ताचा कुंकुम तो भाळी
निढळाच्या मोत्यांची तव कंठी माळा
नामस्मरणे केवळ धरती करी काळा
छळणारे खळ घालती लोटांगण पायी
जय आंबे जगदंबे जय तुळजा माई ।।
तुझिया पूजेसाठी मेघांची भेरी
अभिषेका हस्थाच्या धारांची झारी
रवी चंद्राच्या ज्योती तळपती आकाशी
माय भवानी दर्शन दे हृदयकांशी
मोक्षाचा वर वरदे, विश्वाला देई
जय आंबे जगदंबे जय तुळजा माई ।।
follow us on facebook at : https://www.facebook.com/kikha3692/