MENU

Fun & Interesting

आंब्याची सावली चिचावर गेली (लोकगीत ) विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव, जि. वर्धा

Video Not Working? Fix It Now

सर्व प्रथम जय गुरु, मी नेताजी हिरामन मेश्राम जंगल परिसरानी वेढलेलं छोटंस माझं गांव कुडकवाही जि. गडचिरोली (महाराष्ट्र) भारत आपली संस्कृती चॅनलच्या माध्यमातून मराठी, हिंदी भाषेतील भजन, अभंग व गौळणी इ. आपल्या समोर सादर करून ग्रामीण भागातील पारंपारिक कलेला वाव मिळावा व वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या माध्यमातून समाज जागृतीचा कार्य चॅनल च्या माध्यमातून व्हावा हाच मुख्य उद्देश. आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात संतांचे विचार ल़ोप पावू नये. म्हणून वं. राष्ट्रसंत म्हणतात 'अब साधन बदलना होगा,घर -घर यही गाना होगा '' यासाठी चॅनलच्या माध्यमातून एक अल्पसा प्रयास. मला आशा आहे की, आपण चॅनलशी जुळून व चॅनलच्या माध्यमातून संतांचे विचार इतरांपर्यंत पोहोचायला आपल्या कडून तन-मनानी मदत होऊन सत्कार्याला हातभार लावाल हीच आपल्याप्रर्थी प्रार्थना. परत आपणास विनंती आहे की, चॅनल वर प्रकाशित करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये कलाकार हे गावगाडयातील आहे.काही चूका असतील तर गोड करून घ्यावी. जय गुरु 🙏 आपला विनम्र नेताजी मेश्राम Wellcom to my channel आपली संस्कृती लोकगित आंब्याची सावली चिचवर गेली! पोरगी झाल्यावर बापनं , आस जावयाची केली !! ध्रु !! झाली पोरगी जवानं, नाही पळे त्याला चैन l दोन भाकरिची भूक, भाऊ पोरावर आली l कर्ज काढून रक्कम, उभी त्यानं केली ll 1 ll जवा भरला दरबार, जसा भरला बाजार l म्हणे पोरीला बलाव, केला तिचा गा लिलाव l हुंडा घड्याळ अंगठी, त्याने गा मागली || 2 ll भर हिरव्या मांडवात, समद येगळ घडलं l पहिले दागिने चढलं, मग अक्षिदा पडलं l हात जोडून ईनिले, विनंती गा केली ll 3 ll हुंडा घेऊन पोरीचा, त्याने घेतला गा जिव l या पोरिच्या बापाचा, केला बदनाम नाव l या हुंड्याच्या पायी, नव नवरी जाळली ll 4 ll Netaji Hiraman Meshram From . Kudakwahi Po. Chatgaon Ta. Dhanora Dist. Gadchiroli Mo. No. 9405721853 🙏 जय गुरुदेव 🙏

Comment