Follow the Vaibhav Chhaya Talks channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VakXI7jISTkNUSSyKr0r
सरस्वती-शारदेच्या पुढे शिक्षणदेवता न नेणाऱ्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेच्या विरोधात सावित्रीमाईंचं कार्य अगदी नेमकेपणाने ठेवत ३ जानेवारी खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे काम सुरू केले. सुरूवातीला २८ नोव्हेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला. पण अखेरिस सावित्रीमाईंनाच शिक्षणाचं आणि देशातील स्त्री व शुद्र वर्गाच्या उद्धाराचं आद्य प्रतीक मानून प्रा. अरुण कांबळे यांनी तो पाया रचला असावा. हा विद्रोह नाही. हा इतिहासाचा आणि खऱ्या त्यागाचा, बलिदानाचा विजय आहे. हा उत्सव आहे या भूमीतल्या पहिल्या शिक्षित स्त्रीचा, क्रांतीच्या जननीचा, पहिल्या लेखिकेचा, कवयित्रीचा. पहिल्या शिक्षिकेचा, पहिल्या प्राचार्याचा... जीच्या बळावरच आज या देशातली एकुण एक स्त्री स्वाभिमानानं जीवंत आहे. ज्वलंत महाकाव्यासारखं आयुष्य सोसलेल्या आमच्या आईला कोटी कोटी प्रणाम...