तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध आहे . परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १४८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इ.स. १६५७मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती.
#TikonaFort #TikonaFortTrek #TikonaFortHike #TikonaFortAdventure #TikonaFortHistory #TikonaFortViews #TrekkingInMaharashtra #MaharashtraForts #ShivajiMaharajForts #HillFortTrek #TikonaFortExplore #TrekkingAdventures #ExploreMaharashtra #FortHiking #maharashtratrekking