ज्ञानेश्वरीतील या ओव्या झोपेच्या त्रासासाठी आणि मनशांतीसाठी | # trending
THIS is my original own voice
visuals Is generated by AI
With English subtitle
ज्ञानेश्वरी अध्याय बारावा पहिल्या 16 ओव्या
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥
विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।
ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय ॥ २ ॥
तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।
जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं ॥ ३ ॥
योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।
सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं ॥ ४ ॥
आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।
हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे ॥ ५ ॥
प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।
आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ ६ ॥
सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि ॥ ७ ॥
म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।
या कारणें मी साउली । न संडीं तुझी ॥ ८ ॥
अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।
तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय ॥ ९ ॥
म्हणौनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते ।
आज्ञापीं मातें । ग्रंथनिरूपणीं ॥ १० ॥
नवरसीं भरवीं सागरु । करवीं उचित रत्नांचे आगरु ।
भावार्थाचे गिरिवरु । निफजवीं माये ॥ ११ ॥
साहित्यसोनियाचिया खाणी । उघडवीं देशियेचिया क्षोणीं ।
विवेकवल्लीची लावणी । हों देई सैंघ ॥ १२ ॥
संवादफळनिधानें । प्रमेयाचीं उद्यानें ।
लावीं म्हणे गहनें । निरंतर ॥ १३ ॥
पाखांडाचे दरकुटे । मोडीं वाग्वाद अव्हांटे ।
कुतर्कांचीं दुष्टें । सावजें फेडीं ॥ १४ ॥
श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें ।
राणिवे बैसवी श्रोते । श्रवणाचिये ॥ १५ ॥
ये मराठीयेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।
घेणें देणें सुखचिवरी । हो देई या जगा ॥ १६ ॥
#trending #viral #dhyaneshwari #12 adhyay #ज्ञानेश्वरी #१२ अध्याय #ज्ञानेश्वरीतीलबारावाअध्याय #सोळाओव्या #झोपयेण्यासाठी #उपचार #मनशांतीसाठीओव्या