MENU

Fun & Interesting

पुण्यातील महिलेचा प्रताप; घरात पाळल्या ३०० मांजरी, नागरिक हैराण, प्रशासनही परेशान | Pune News

Azad Marathi 91,488 lượt xem 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

Azad Marathi :
पुण्यात एका महिलेने आपल्या घरात तब्बल ३०० मांजरी पाळल्या आहेत! 😮 यामुळे शेजारीपाजारी त्रस्त झाले असून, दुर्गंधी, आरोग्याच्या समस्या आणि सततचा गोंधळ यामुळे प्रशासनालाही डोकेदुखी वाढली आहे. 🏠🐾

✅ या व्हिडीओमध्ये पाहा:
🔹 ह्या महिलेची कहाणी – का आणि कशी पाळल्या इतक्या मांजरी?
🔹 स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया – त्रास किती वाढलाय?
🔹 प्रशासनाची कारवाई – कायद्यानुसार यावर उपाय आहे का?

📢 तुमचा यावर काय विचार आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा! 📝
👍 व्हिडीओला Like, Share आणि Subscribe करा!🔔

#PuneNews #CatLover #ViralNews #MaharashtraNews #AnimalLover #Viralnews #Cats

Twitter: https://twitter.com/AzadMarathi

Instagram: https://www.instagram.com/azadmarathi/

Facebook: https://www.facebook.com/azadmarathi

Sharechat: https://sharechat.com/azadmarathi

COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976

COPYRIGHT DISCLAIMER UNDER SECTION 107 OF THE COPYRIGHT ACT 1976, ALLOWANCE IS MADE FOR "FAIR USE" FOR PURPOSES SUCH AS CRITICISM, COMMENT, NEWS REPORTING, TEACHING, SCHOLARSHIP AND RESEARCH. FAIR USE IS A USE PERMITTED BY COPYRIGHT STATUE THAT MIGHT OTHERWISE BE INFRINGING. NON PROFIT, EDUCATIONAL OR PERSONAL USE TIPS THE BALANCE IN FAVOR OF FAIR USE.

A woman in Pune has kept as many as 300 cats in her house! 😮 This has caused trouble for neighbors, and the administration has also been given headaches due to the stench, health problems, and constant chaos. 🏠🐾
पुण्यात 3BHK फ्लॅटमध्ये 350 मांजरांचे राज्य! सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणपुणे: हडपसर येथील मार्व्हल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने तब्बल 350 मांजरांना 3BHK फ्लॅटमध्ये ठेवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे इतर रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, दुर्गंधी, आरोग्य धोक्यात आणि सततचा आवाज यामुळे संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिक त्रस्त, प्रशासनाकडे तक्रारींचा पाढाया महिलेला मांजर पाळण्याची आवड असल्याचे समजते, मात्र संख्येचे प्रमाण प्रचंड वाढल्याने इतर रहिवाशांचे जगणे मुश्किल झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा वाद सुरू असून नागरिकांनी पुणे महापालिका आणि पोलिसांकडे याबाबत वेळोवेळी तक्रार केली आहे.
मांजरांमुळे होणारा त्रास:
घराबाहेर प्रचंड दुर्गंधी, विशेषतः जेवण बनवताना किंवा खिडकी उघडली की घाण वासाचा त्राससकाळ, दुपार, संध्याकाळ सतत मांजरांच्या ओरडण्याचा आवाजड्रेनेजमधून घाण पाणी जाण्यामुळे सोसायटीच्या स्वच्छतेवर परिणामआरोग्यास धोका, संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती
महापालिकेची कारवाई सुरू
सोसायटीतील रहिवाशांनी 2020 मध्ये पहिल्यांदा याबाबत तक्रार केली होती. त्यावेळी या महिलेकडे ५० मांजर असल्याचे समोर आले होते, मात्र आता त्यांची संख्या ३५० वर पोहोचली आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.
रहिवाशांनी प्रशासनाकडे या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली असून, या महिलेला इतक्या मोठ्या संख्येने मांजर पाळण्याची परवानगी द्यावी का? याबाबतही चर्चा रंगली आहे. आता महापालिका आणि पोलिसांची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Comment