कलयुगातील झाशीची राणी नानीबाई गव्हाणे | आज्जीची घोडेस्वारी | horse riding | horse rider grand mother | शोध वार्ता |
#एकमराठालाखमराठा
#झाशीचीराणी
#महाराणीताराबाई
#shodhvarta
----------------------------------------------------------------------------------
लहानाबाई राजाराम गव्हाणे या आजी मागच्या दहा ते बारा वर्षांपासून घोडा सवारी करतात. त्यामध्ये शेतातील काम असतील, आठवडी बाजारात जाणं असेल किंवा गावातील छोटे-मोठे काही काम असतील, ही सर्व कामे आपल्या घोड्यावर बसून करतात. समाज काय म्हणतो, समाजाला काय वाटतं या गोष्टीची कसली तमा न बाळगणाऱ्या आजी आज ठणकावून सांगतात की मला अभिमान वाटतो की मी घोडेसवारी करत आहे.
एका शेतकरी महिलेचा स्वाभिमान कसा असावा याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपल्या आजी आहेत. गावापासून डोंगरदऱ्यात चक्क चार ते पाच किलोमीटर राहणाऱ्या आजी उत्तम शेती करतात. एक मुलगा राज्याच्या पोलिस खात्यामध्ये आणि दुसरा मुलगा ट्रक चालक असा आजीचा परिवार सदन आहे....
आजीच्या या धाडसी स्वभावाची आणि घोडेसवारीची चर्चा सबंध महाराष्ट्रात होताना दिसत आहे 'शोध वार्ताने' घेतलेला हा शोध कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा...🙏
----------------------------------------------------------------------------------