प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ श्री. किरण पुरंदरे (किका) यांनी शुभारंभ लॉन, पुणे येथे 1 जुलै 2023 रोजी रानगोष्टी हा कार्यक्रम सादर केला.
किका आता भंडारा जिल्ह्यातल्या पिटेझरी गावात राहतात व तिथून नागझिरा अभयारण्य जवळ आहे. तिथे घडलेले अद्भुत प्रसंग त्यांनी आपल्या ओघमय वाणीत सादर केले तसेच विविध पक्षी व प्राणी यांच्या आवाजाची झलक या
व्हिडिओत बघायला मिळेल.
हा कार्यक्रम पुण्याच्या Nature Walk Charitable Trust मार्फत आयोजित केलेला होता.
प्रमुख उपस्थितांमध्ये अभिनेते श्री. गिरीश कुलकर्णी व सुयश टिळक होते.