MENU

Fun & Interesting

माननीय विधिमंडळ नेते श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ | मुंबई

Video Not Working? Fix It Now

माननीय विधिमंडळ नेते श्री. जयंतराव पाटील | महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२५ | मुंबई

आज आपण महानगरपालिकेला कर्ज देऊ शकत नाही, अशी राज्य सरकारची परिस्थिती झालीये या शब्दात माजी अर्थमंत्री विधिमंडळ नेते जयंतराव पाटील यांनी सरकारवर ताशेरे ओढले. अर्थसंकल्पावरील चर्चेत त्यांनी सभागृहात आपले विचार मांडले. राज्यातील लोकांनी मोठे बहुमत सरकारला दिले. त्या लोकांना अपेक्षा होती पण अर्थसंकल्पातून मोठा अपेक्षांचा भंग झालाय, असेही ते म्हणाले.

अर्थसंकल्पाच्या भाषणात प्रभू श्रीरामाचा उल्लेख आला. रामटेकमध्ये सत्ताधारी सांस्कृतिक महोत्सव आयोजित करणार आहेत. प्राण गेले तरी चालतील पण वचन तुटू नये ही भूमिका रामाची होती. या सत्ताधाऱ्यांनी रामाचादेखील त्यांना विसर पडल्याचा हल्लाबोल जयंत पाटील यांनी सरकारवर केला. निवडणुकीच्या आधी तिन्ही पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली त्यापैकी एकही आश्वासन आज पूर्ण झाली नाही, असे ते म्हणाले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की, कोरोना काळात ज्या शिवभोजन थाळीने लाखो लोकांना आधार दिला आणि आजही लाखो गरिबांसाठी ही थाळी वरदान आहे, त्या शिवभोजन थाळीलादेखील बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला दिसतोय.

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचे देवेंद्रजी वारंवार सांगतात मात्र हे करत असताना कमीत कमी १४ ते १५ टक्के इतका विकासदर आवश्यक आहे. आज अर्थव्यवस्थेचा विकासदर ७.३ टक्के इतकाच आहे. गेल्यावर्षी तो ८ टक्के इतका होता. हा विकासदर डबल झाला तरच आपल्याला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था ही दृष्टीक्षेपात येईल या वस्तूस्थितीची आमदार महोदयांनी राज्य सरकारला जाणीव करून दिली. या अर्थसंकल्पात नवीन रोजगाराच्या निर्मिती बद्दल भरीव काहीही तरतूद नाही. नव उद्योजकांसाठी, आदिवासींसाठी, तरुण- तरुणींसाठी, जेष्ठ नागरिकांसाठी काही नसल्याचे दिसले. उत्पादन आणि सेवा विभागाच्या ग्रोथमध्ये घट झालीये. या दोन सेक्टरमध्ये वाढ होणे गरजेचे आहे कारण यामध्ये रोजगार निर्माण करण्यात महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.

Labour Force Periodic Survey २०२३-२४ नुसार राज्यात ग्रामीण महिलांच्या बेरोजगारीच्या दरात वाढ झाली असून शहरी पुरुषांमध्ये देखील वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात manufacturing आणि services मधील घट चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या महसुली तुटीत वाढ झाली आहे. यावर सविस्तर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे महसुली तूट ही अंदाजे २० हजार कोटी वरून वाढून ४५ हजार ८९२ कोटी दाखवली आहे. मागच्या वर्षी २० हजार कोटींची तूट दाखवलेली ती २६ हजार ५३६ कोटींवर सुधारित अंदाजाने पोहोचली. म्हणेज यावर्षी एकूण तूट ६० हजार कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. राजकोषीय तूट देखील १ लाख १० हजार कोटीवरून आज ती १ लाख ३६ हजार कोटींवर गेली आहे. हा आकडा सुद्धा दीड लाख कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज वाटतो.

राज्यावर कर्जाचा बोजा वाढला असून २०२२-२०२३ मध्ये ६ लाख २९ हजार २३५ कोटी होते आणि २०२५-२६ मध्ये हे कर्ज ९ लाख ३२ हजार २४२ कोटी रुपये एवढे होणार आहे. आपण १२ कोटी ९३ लाख ऐवढी अंदाजित लोकसंख्या आहे असे समजले तर प्रत्येकाच्या डोक्यावर ७२ हजार १०० रुपये एवढे कर्ज असल्याची चिंता, जयंत पाटील यांनी व्यक्त केली. निवडणुका आल्या की डबल इंजिन सरकार असे हे सरकार स्वतःला सांगते एक इंजिन केंद्रातले आणि दुसरा राज्यातले. निवडणूक झाल्या कि केंद्राकडून येणाऱ्या grants-in-aid मध्ये चांगलीच कपात झाल्याचे दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला. यासह इतर अनेक महत्तपूर्ण बाबींकडे सरकारचे लक्ष वेधून राज्याच्या नुकसानीची जाणीव करुन दिली.

#BudgetSession #BudgetSession2025   #maharashtra #vidhansabha #NCPSP #SharadPawar #JayantPatil

Comment