प्रांजू प्रदनु गेले मामाकडे गणपतीला 😍 | मावशीने केला पाहुणचार - Ambavali, Mandangad (Konkan) कोकणात गणपतीला गावी आलो की, प्रांजू प्रदनु मामाकडे जातात. गणपती सणामध्ये कोकणात एक वेगळीच मजा असते. साखरी हे प्रदनु प्रांजूचे मामाचे गाव आहे. हे माझ्या बाबांचे सुद्धा मामाचे गाव आहे. बाबांच्या मामाच्या घरी गणपती बाप्पा येतात. दरवर्षी आम्ही न चुकता साखरीला बाप्पाचा नवस घेऊन जातो. साखरीला भोसले, रांगले, खेराडे यांच्याकडे गणपती येतात. आम्ही गावातील बाप्पांचे दर्शन घेतले. साखरीला बाप्पांचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही दुपारी वेळास गावी जायला निघालो. वेळास गावात वर्षाची बहीण राहते. आम्ही बऱ्याच वर्षांनी वेळास गावात गेलो. प्रांजू प्रदनूच्या मावशीने आमचा पाहुणचार केला. तेजल ताईंच्या घरी सुद्धा गणपती बाप्पा येतात. वेळास गाव खूप सुंदर आहे. वेळास गाव समुद्राच्या किनारी वसलेलं आहे. गणपती सणामध्ये कोकणात कसं वातावरण हे बघायला मिळणार आहे. कोकणात गणपती सणामध्ये पाहूणेमंडळी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला घरी येतात. गणपती सणामध्ये गावी वेगळंच वातावरण असतं. वर्षा बहिणीला भेटल्यावर खुश झाली. प्रांजू प्रदनु सुद्धा मावशीला भेटून आनंदित झाले. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमचं गाव ते साखरी गाव प्रवास, प्रदनु प्रांजूच्या मामाचे गाव दाखवले आहे.गणपती सणामधली कोकणातलं वातावरण बघायला मिळणार आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#PranjuPradanuGeleMamakadeGanpatila #MavshineKelaPahunchar #GanpatiFestival #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
https://t.me/sforsatish_official