MENU

Fun & Interesting

कुरकुरीत व्हेज स्प्रिंग रोल्स | स्प्रिंग रोल शीट्स बनवण्यापासून सविस्तर कृती Veg Spring Rolls Recipe

Sarita's Kitchen 52,697 2 days ago
Video Not Working? Fix It Now

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - https://saritaskitchenofficial.com/ • Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7GV6&marketplaceID=A21TJRUUN4KGV कुरकुरीत व्हेज स्प्रिंग रोल्स | स्प्रिंग रोल शीट्स बनवण्यापासून सविस्तर कृती Veg Spring Rolls Recipe व्हेज स्प्रिंग रोल्स रेसिपी | व्हेज स्प्रिंग रोल्स | स्प्रिंग रोल्स | कुरकुरीत स्प्रिंग रोल्स | हॉटेलसारखे स्प्रिंग रोल्स रेसिपी | Veg Spring Rolls Recipe | Veg Spring Rolls | Kurkurit Spring Rolls Recipe | Spring rolls sheets | Homemade Veg Spring Rolls | Spring Rolls recipes from scratch  साहित्य | Ingredients  स्प्रिंग रोल शीट्स बनवण्यासाठी | To Make Spring Rolls sheets • मैदा १ कप | Maida 1 cup • तेल १ टीस्पून | Oil 1 tsp • मीठ चवीनुसार | Salt to taste • पाणी १/२ कप अंदाजे | Water ½ cup approx • तेल २-३ चमचे (आतून लावण्यासाठी) | Oil 2-3 tbsp (to put inside) • कॉर्नफ्लोअर २-३ चमचे | Cornflour 2-3 tbsp सारण करण्यासाठी |For Stuffing • तेल २ टीस्पून | Oil 2 tsp • किसलेले आले १ टीस्पून | Grated Ginger 1 tsp • बारीक चिरलेला लसूण १ टेबलस्पून | Finely Chopped Garlic 1 tbsp • बारीक चिरलेली हिरवी मिरची १ टीस्पून | Chopped green chilies 1 tsp • पातीचा कांदा पांढरा पातळ कापून १/४ कप | Slices spring onions white ¼ cup • उभे पातळ चिरलेले गाजर (जुलियन्स) १/२ कप | Thinly Sliced carrots ½ cup • उभी पातळ चिरलेली शिमला १/२ कप | Thinly sliced campsicum ½ cup • उभा पातळ चिरलेला कोबी १ कप | Thinly chopped cabbage 1 cup • पातळ चिरलेले बीन्स १/२ कप |Thinly sliced beans ½ cup • मीठ चवीनुसार | Salt to taste • मिरपूड १/२ टीस्पून |Black Pepper pw ½ tsp • सोया सॉस १ टीस्पून | Soy sauce 1 tsp • टोमॅटो सॉस १ टीस्पून | Tomato sauce 1 tsp • चिरलेली कांदा पात मूठभर | handful of Chopped fresh spring onions greens  • तेल तळणीसाठी |Oil for frying स्प्रिंग रोल्स शीट्स बनवण्यासाठी | • एका भांड्यात मैदा, मीठ मिसळून पाणी घालून मैदा थोडा मऊ भिजवून घ्या, थोडे तेल लावून १५ मिनिटे झाकून ठेवा • १५ मिनिटांनी तेल लावत लावत ४- ५मिनिटें चांगले मळून मऊ करून घ्या • आता भिजवलेल्या मैद्याचे, पुरीला करतो त्यापेक्षा थोडे मोठे गोळे करून घ्या • कोरड्या मैद्या मध्ये घोळवून, जाडसर पोळी लाटून घ्या • एकूण ३ पोळी लाटाव्यात • एका पोळीला, १/२ चमचा तेल पसरून लावा, त्यावर १/२ चमचा कॉर्नफ्लोअर भुरभुरून चमच्याने पसरून लावा.  • आता त्यावर दुसरी पोळी ठेवा, तिलाही असेच तेल व कॉर्नफ्लोअर लावा • आता तिसरी पोळी त्यावर ठेवा, कांदा व्यवस्थित चिकटवून घ्या • हलक्या हाताने, तिन्ही पोळ्या एकत्रित घेऊन एकसारखे लाटून घ्या • पोळी भाजण्यासाठी ताव हलका गरम होऊ द्या • त्यावर पोळी टाका व मंद आचेवर पोळीला डाग न येता, हलका रंग बदलेपर्यंत भाजा • पोळी उलटून, दुसऱ्या बाजूने हि डाग न येता मंद आचे वर भाजा • लगेच काढून घ्या, व कड्या मोकळ्या करून तिन्ही पोळ्या वेगवेगळ्या करा • अशाच प्रकारे ३-३ गोळे एकत्र लाटून व भाजून उरलेल्या पिठापासून स्प्रिंग रोल्स शीट्स बनवून घ्या स्प्रिंग रोल्स चे सारण करण्यासाठी | • कढईमध्ये तेल गरम करा, त्यात किसलेले आले, लसूण, व हिरवी मिरची मोठ्या आचेवर २ मिनिटे परतून घ्या • आता ताजा पातीचा कांदा घालून १ मिनिटभर परता  • आता सगळ्या भाज्या घाला, मीठ, मिरपूड घालून २ मिनिटे परतून घ्या • शेवटी सोया सॉस, टोमॅटो सॉस घालून २ मिनिटे परतून घ्या • गॅस बंद करा व सारण गार होऊ द्या स्प्रिंग रोल्स भरण्यासाठी | • थोडा मैदा वाटीत घेऊन, त्यात थोडे पाणी घालून मैद्याची पेस्ट करा • तयार शीट्स पैकी एक शीत पसरून, त्यावर साधारण २ टेबलस्पून सारण, पोळीच्या कडेला, उभट पसरून घ्या • जवळच्या बाजूचे काठ सरणावर ठेवा, हलक्या हाताने साईडच्या कडा पण दुमडून घ्या • आता तयार मैद्याची पेस्ट उरलेल्या पोळीच्या कडेला लावून घ्या, मग सारणाचा रोल करून कडा व्यवस्थित बंद करा • उरलेले शीट्स आणि सारणाचे असेच रोल्स करून घ्या • स्प्रिंग रोल्स तळण्यासाठी | • तेल हलके गरम होऊ द्या, जास्त कडकडीत नको. त्यामध्ये रोल्स तळण्यासाठी सोडा • २ मिनिटांनी उलटून घ्या, मंद आचे वर दोन्ही बाजू तळून घ्या • शेवटचा १ मिनिट मोठ्या आचे वर तळा Other Recipes  • हळदी कुंकू / पार्टीसाठी स्नॅक्स कुरकुरीत व्हेज कटलेट | एकदा करून ठेवा, ऐनवेळी तळा Crispy Veg Cutlets https://youtu.be/RXjRiiPEaIk?si=XNWICoC60kWkzFcr  • सकाळच्या घाईत टिफिनमध्ये काय द्यावं सुचत नाही?अर्ध्या तासात तयार होईल असे ज्वारीचे धिरडे Paneer Roll https://youtu.be/CABj_vqTfU0?si=iYcm9-HAHqNY-5X3  • शाळेचा डब्बा 5 | मुलांच्या डब्यासाठी सकाळच्या घाईत झटपट २ रेसिपीज गुळपोळी, पनीर पॉकेट Tiffin Recipes https://youtu.be/2HwwFiCO33c?si=_A-QWZdozB1fadCr  #vegspringerolls #springrollsrecipe #springrollrecipeinmarathi #springrolls #restaurantstylestarterrecipes #starterrecieps #saritakitchenmarathi #स्प्रिंगरोलरेसिपी #व्हेजस्प्रिंगरोलरेसिपी  #saritaskitchen #सरिताकिचन For collaboration enquiries – [email protected]

Comment