श्री स्वामी समर्थ मंत्र अखंड नामस्मरण 11 माळी जप (11×108=1188 जप) निष्काम व निरपेक्ष भावाने श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचे चरणी समर्पित. हा आॅडीओ ट्रॅक दररोजच्या नित्य मंत्र जप उपासनेसाठी खास बनवला आहे, जपाला थोडी स्पीड आहे जेणे करुन आजच्या धावपळीतही आपण सहज सोप्प्या पद्धतीने दिवसभरात किमान अकरा माळी "श्री स्वामी समर्थ" या स्वयंसिद्ध षडाक्षरी सद्गुरुंच्या मंत्राचा जप आपल्याला कमीत कमी वेळात करता येईल, या आॅडीओ ट्रॅक चा उपयोग प्रवासात किंवा इतर कधीही वेळी हेडफोन कानात लावून जप माळ हातात नसतांनाही 11 माळी जपाचा आपला नित्य सेवा क्रम विना खंड करता सहज करणे सोपे होईल या हेतूने व निरपेक्ष निष्काम प्रेमभक्तीने बनवलेला आहे, आपण सर्व स्वामी भक्त सेवेकरी यांनी याचा पूरेपूर लाभ घ्यावा ही विनंती. व आपल्या इष्ट सोयरे मित्र मंडळी आप्तेष्टांनाही शेअर करावा ही नम्र विनंती......🙏⛳👍 ॥ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ॥