2010 मध्ये Wardha मधून हरवली, 15 वर्षांनी हरियाणात सापडली, वर्ध्यातील इशा घरच्यांना कशी सापडली ?
#BolBhidu #WardhaMissingGirl #Haryana
वर्ध्यातून २०१० मध्ये आपल्या आईसोबत सात वर्षांची ईशा ढोके घरातून बाहेर पडली. ईशाच्या वडिलांच्या वाईट सवयींमुळं तिची आई आपल्या मुलीला घेऊन घराबाहेर पडली. या दोघी जणी थेट हरियाणात पोहोचल्या. तिथे पानिपत रेल्वे स्टेशनवर या दोघी होत्या. पण त्याचवेळी ईशा आणि तिची आई एकमेकांपासून वेगळ्या झाल्या आणि फक्त सात वर्षांची इशा आपल्या घरच्यांपासून शेकडो किलोमीटर लांब एकटी पडली. सुदैवानं ईशाला पोलिसांनी योग्य त्या ठिकाणी नेलं. पण इशाला आपल्या कुटुंबाची ओढ लागून राहिली होती. कधीतरी आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ, या वेड्या आशेवर इशा दिवस काढत होती. पण अखेर इशाची ही वेडी आशा खरी ठरली.
वर्ध्यातल्या आपल्या घरच्यांपासून दुरावलेली आणि थेट हरियाणात पोहोचलेल्या इशाला तब्बल १५ वर्षांनी आपल्या कुटुंबाचा शोध लागलाय. हरियाणा पोलिसांच्या अंटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटनं केलेल्या कामगिरीमुळं इशा आज आपल्या घरच्यांसोबत आहे. सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्यांच्या टोपीमुळं इशाच्या घरच्यांना शोधण्यात यश आल्याचं हरियाणा पोलिसांकडून सांगितलं जातंय. वर्ध्यातली इशा १५ वर्षांनी तिच्या घरच्यांना कशी सापडली, यामध्ये तिच्या घरच्यांच्या टोपीचा काय रोल होता, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/