MENU

Fun & Interesting

खोटी सही केल्याची शिक्षकांकडे तक्रार, ७वी मधल्या मुलाकडून सुपारी, Daund च्या शाळेतलं प्रकरण काय ?

BolBhidu 273,610 lượt xem 1 week ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #DaundCrime #PuneCrime

सुपारी.... गुन्हेगारी विश्वातला कॉमन पण डेंजर शब्द. गावगुंडांपासून अंडरवर्ल्डपर्यंत गुन्हेगारी क्षेत्रात कोणीतरी कोणाची सुपारी घेत असतं, नाहीतर कोणीतरी कोणाची सुपारी वाजवत असतं. त्यामुळं सुपारी हा शब्द आणि पदार्थ आकारानं छोटा असला तरी गुन्हेगारी क्षेत्रात सुपारी म्हणजे मोठा विषय. सुपारी खोक्याची आहे की पेटीची यावरुन सुपारी मोठी की छोटी हे ठरत असतं. कितीही किरकोळ असली तरी गुन्हेगारी क्षेत्रात हजाराच्या खाली सुपारीला मार्केट नाही. थोडक्यात काय तर सुपारी देणं, घेणं किंवा ती वाजवण्यासाठी गंभीर गुन्हे करणं हे अट्टल गुन्हेगारांचं काम. पण सातवीतल्या एका विद्यार्थ्यानं आपल्याच वर्गमैत्रिणीची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातल्या दौंड इथे घडलाय.

वर्गमैत्रिणीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्याची सुपारी या विद्यार्थ्यानं आपल्याच शाळेतल्या मुलाला दिली. या सुपारीची किंमत होती, १०० रुपये. या प्रकारामुळं सध्या आश्चर्य व्यक्त केलं जातंय. कहर म्हणजे शाळेची बदनामी होऊ नये म्हणून शाळा प्रशासनाकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही समोर आलंय. पण या मुलीच्या पालकांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. दौंडच्या शाळेतलं हे सुपारीचं प्रकरण नक्की आहे काय, हे प्रकरण कसं उघडकीस आलं, पोलिसांकडून या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आलीय, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment