जबरदस्त..ऊसाच्या ८६०३२ आणि २६५ वाणाचे AI मुळे वजन, कांडी, उंची किती वाढली ? शेतकऱ्यांचे परिक्षण
जबरदस्त..ऊसाच्या ८६०३२ आणि २६५ वाणाचे AI मुळे वजन, कांडी, उंची किती वाढली ? शेतकऱ्यांचे परिक्षण
यावर जगभरात चर्चा सूरू झाली आहे. सत्या नडेला यांनी दिल्लीत गेल्या आठवड्यात याचा उल्लेख केला. आपनं तज्ञ, शेतकऱ्यांना घेवून याचे परिक्षण केले आहे.
बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट, आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्म ऑफ फ्यूचर’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा उद्देश आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), उपग्रह, ड्रोन, आणि रोबोटिक्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत आणि अधिक उत्पादनक्षम शेती पद्धती विकसित करणे आहे. 
या उपक्रमांतर्गत, ऊस शेतीत AI चा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाच्या यशस्वी चाचण्या कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे पार पडल्या आहेत. आता हा प्रकल्प महाराष्ट्रातील सुमारे 1000 शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
या प्रकल्पामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक नफा मिळविणारी शेती पद्धती अवलंबता येईल, तसेच हवामान बदलांच्या परिणामांशी सामना करण्यास मदत होईल. बारामतीत सुरू होणारे हे केंद्र वॉशिंग्टननंतर जगातील दुसरे असे संशोधन केंद्र ठरणार आहे, ज्यामुळे बारामतीचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित होईल.