Chadniche Mase : चढणीचे मासे, नदीला पूर, मुसळधार पाऊस, पाण्याचे रौद्र रूप | Traditional Fishing | Kokankar Avinash
आज पावसाचा जोर चांगला होता. मी आणि बंटी गेलो निघालो ओढ्यावर. बबलू आणि विवेक तर पुढे गेले होते. ओढ्यावर पोचेपर्यंत पावसाचा जोर तेवढाच होता. आम्ही पोचलो तो पर्यंत ओढ्याला पाणी पोचले नव्हते. मुसळधार पाऊस आणि बघता बघता ओढ्याला पाणी तुडुंब वाहू लागले. नदी किंवा ओढ्याला पाणी अचानक कसे वाढते त्याचे जितेजागते उदाहरण आज आम्ही बघत होतो. आम्ही ओढा क्रॉस करून दुसऱ्या बाजूस गेलो खरे पण त्याबाजूस पण पाणी आले. मासे पकडायला काही मिळाले नाहीत. ओढ्याला आलेला पूर बघत आम्ही पलीकडे थांबलो. साधारण १ -२ तास पाणी तसेच वाहत होते मग पाण्याचा वेग कमी झाला. तेव्हा जाळीने झोल मारून मासे पकडायचे सुरु झाले. दोन चार झोल मारले मासे पकडले. वाटणी झाली आणि आम्ही निघालो घरी.
#chadnichemase #chadnichemase #traditionalfishing #KokanatilChadnicheMase
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
_________________________________________________________________________________________________
कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. यात मिळणा-या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात. खा-या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. मात्र या काळात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत.
पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात , छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात.
चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो.
चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो. दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते.
काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात.रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकुन पकडले जाते. कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावुन शेतघरातच भाजुनही खातात.
चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या. कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये खडस , गोडया पाण्यातील झिंगा , सुतेरी ,शिंगटी ,दांडकी , वाळव , पानकी ,काडी इ. मासे मिळतात.
chadniche mase in konkan
chadniche mase
chadniche mase kokan
chadniche mase kase pakdayche
chadniche mase recipe
chadhniche mase in konkan
chadhniche mase
chadhniche mase
chadhiche mase kokan
chadhniche mase kase pakdayche
chadhniche mase recipe
Kokanatil chadniche mase
kokanatil mase pakadne
kokanatil mase
kokanatil chadhaniche mase
कोकणातील चढणीचे मासे
चढणीचे मासे
चढणीचे मासे पकडणे
कोकणातील चडणीचे मासे
चडणीचे मासे
कोकणातील चढणीचे मासे
पावसाळी मासेमारीची मज्जा
पहिल्या पावसातील मासे
Fishing In Konkan
Kokan Fishing
Konkan Fishing
Kokan River Fishing
Konkan River Fishing
_________________________________________________________________________________________________
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : https://www.youtube.com/@RecipesKatta
Entertainment Katta : https://www.youtube.com/@EntertainmentKatta
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5wtsmCHDynYDiNZA2N
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw/join
Give Review about my Channel on Google Page :-
https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAvinash
Facebook : https://www.facebook.com/Kokankaravinash
Instagram : https://www.instagram.com/KokankarAvinash
Youtube : https://www.youtube.com/KokankarAvinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger