#sambhajimaharaj #chhavaa #shivajimaharaj
31 जानेवारीची.. रात्र पन्हाळगड शांत होता. पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता. अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली. प्रकरण त्याच्या ध्यानात आलं. तसा तो पळत बालेकिल्ल्यात धावत आला आणि सरनौबत म्हलोजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की, घात झाला घोरपडे बाबा.. कोल्हापूरचा तळ संगमेश्वरच्या रोखानं दौडतोय. पण नेमके घोडे किती आहेत ? हे कळेना.. लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले, म्हलोजी, संताजी व बहिर्जी यांना सोबत घेऊन कोकण दरवाज्यानं पन्हाळा उतरले आणि संगमेश्वरच्या दिशेनं त्यांनी घोड्यांना टाच मारली. दुसरीकडं कोल्हापूरहून आंबा घाट मार्गानं मुकर्रब खान आपला मुलगा इखलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता. काही वेळानं संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली. एकीकडं रायगडाला वेढा पडलेला होता, दुसरीकडं शत्रू चालून येत होता. स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि चहूबाजूनं अडकलेले संभाजी महाराज शांतपणे येर झाऱ्या मारत होते. संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की, हा डाव कोणाचा आहे ? कोल्हापूर शिवाय शत्रूंचा आसपास दुसरा तळ नव्हता. एवढ्या आड वाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती. अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्के यांचाच होता. या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला. तसेच हातात तलवार घेऊन संभाजी राजे बाहेर आले. म्हलोजी आणि त्यांचं सैन्य देखील प्राणपणानं लढत होतं. सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं.. सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं. गर्दीतून वाट तयार करत, शत्रूंशी सामना करत शंभुराजे नावडीच्या नदी काठापर्यंत पोहोचले. पण त्यांच्या कानावर बातमी आली म्हलोजी बाबा पडले. तसं त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले. मोठ्या दमानं ते लढले. पण अखेर शत्रूंची दोर हातात बांधली गेली. इखलास दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला. पण थोडा वेळ जरी थांबलं तरी बाजी पलटू शकते, हे लक्षात घेऊन मुकर्रब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करुन तिथून निघाला. शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणतो. पुढं शंभू राजांसोबत औरंगजेबानं जे केलं ते आपण सगळेच जाणतो. पण खऱ्या अर्थानं शंभू महाराज शत्रूंच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के यांच्यामुळंच ? पण नेमकं इतिहास काय सांगतो ? गणोजी, नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली ? कशी केली आणि मुळात संभाजी राजांनंतर पुढं गणोजीचं काय झालं ? याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official
►Website - https://maharashtrabhumi.in/
►FB - https://www.facebook.com/maharashtrabhumiofficial
►Insta - https://www.instagram.com/maharashtra_bhumi_official/
►Twitter - https://twitter.com/mahabhumi22
►YouTube - https://www.youtube.com/@maharashtra_bhumi_official
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp.com/HHDc9QLPzfWGJMzvcPJZgY
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Whatsapp: +91 96072 98870
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
#eknathshinde #shindefadnavisgovt #marathilive #breakingnews #marathibreakingnews #newsupdateslive #marathinews #newsupdates #maharashtrabhumi #maharashtrabhumiofficial #mahabhumi #maharashtranews