हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणासाठी हर्णेच्या सागरी किनाऱ्यावर तीन किनारी किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. ते तीन दुर्ग म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड.
सुवर्णदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रातील एका बेटावर असल्याने सामाजिक द्रुट्या महत्त्वाचे होते. १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी अली आदिल शाह यांच्याकडून ताब्यात घेतल्यावर हा किल्ला मराठा राजवटीत आला. विजापूरच्या राजांनी हा किल्ला बांधला होता. सुवर्णदुर्ग किल्ला हे शिवाजी महाराजांचे सेनापती कान्होजी आंग्रे यांचे जन्मस्थान होते.
कड्यावरचा गणपती हे आज कोकणातील एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
या गणपती मंदिराला कड्यावरचा गणपती असे म्हटले जात. याचे कारण म्हणजे गणपतीचे स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर आहे.इथून खाली उतरायला पायऱ्या देखील आहेत. हे मंदिर पूर्वी गावातील समुद्राच्या काठी आहे. मात्र समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर पाण्यामध्ये गेले. यानंतर समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आले. यावेळी साक्षात श्रीगणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले. त्याला ‘गणपतीचे पाऊल’ असे म्हटले जाते आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले.यामुळे कड्यावरचा गणपती अस बोलला जात.
श्री स्वयंभू चंडिका देवीचे रुप जेव्हढे सुंदर तेव्हढेच रौद्रही भासते. देवीच्या भुवया मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असल्याचे सांगतात.दाभोळ गावात असलेल्या ईंगळाइ-भैरीदेवी या श्री चंडीकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर, नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तीने आपल्या छत्रछायेखाली घेतले आहे असे स्थानिकांचे मत आहे. अशा या जागृत देवीचे दर्शन घेऊन त्या अंधाऱ्या गुहेतून पणत्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो. बाहेरील रचनेवरून आत असलेल्या गुहेची अजिबातच कल्पना येत नाहि. फार पूर्वी दालभ्य ऋषींनी या गुहेत तपसाधना केल्याचे सांगितले जाते