Red & Circle Creations presents
ViP Shree Productions
शिमगा सण गीत
देव निघालं देवळातून..
निर्माता
तुषार पालकर (विलवडे, लांजा)
गीतकार / गायक
शाहीर विकास लांबोरे
संगीतकार
साहिल शिवगण
रेकॉर्डिंग
नवलाई म्युझिक प्रोडक्शन
DOP / EDITING
विजय मायंगडे
पोस्टर
MN Creations
प्रसिद्धी प्रमुख
प्राजक्ता सोलकर, निलेश किंजळकर, निखिल गोंधळी, धनश्री चौगुले
विशेष आभार
दिग्विजय डेरे
राम शेळके
रूपं लावताना हा क्षण
पारणं फिटतंय हो पाहून..
देव निघालं देवळातून
नी बसलं पालखीमदी जाऊन.... ||
ह्या शिमग्याच्या दिसामधी
होते गावाची ही पंढरी,
गावशिवाचं घर मंदिर
होई प्रसन्न गावपांढरी,
देवा तुझं हे सारं ऋण
आसं जमलं कसं विसरून..
देव निघाले देवळातून
नी बैसलं पालखीमधी जाऊन ||
हात जोडतोय सारा गाव,
करी सुखाचा हा जापसाल,
गावदेवाच्या कृपेनं,
दिस सोन्याचं हे आलं..
गाव नांदो माझं सुखानं
हेच पायी तुझ्या मागणं
देव निघालं देवळातून
नी बसलं पालखीमदी जाऊन..
#शिमगा
#shimga
#shimgasong2025
#शिमगा song
#SHIMGA2025
#शिमगा2025
#कोकण
#kokan
#konkan