#BolBhidu #KarunaSharma #DhanajayMunde
१२ जानेवारी २०२१ ला धनंजय मुंडेंच्य़ाच फेसबुक पोस्टमधील स्पष्टीकरणातून करुणा शर्मा हे नाव सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं. या करुणा शर्मा कोण ? तर धनंजय मुंडेंवर अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माच्या भगिनी आणि स्वतः करुणा मुंडे यांच्या दाव्यानुसार धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी. या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनी त्यांच्यावरील अत्याचाराचे आरोप फेटाळताना फेसबुक पोस्टमधून सांगितलं होतं "करुणा शर्मा यांच्याशी माझे २००३ पासूनच परस्पर सहमतीने संबंध आहेत आणि करुणा यांच्यापासून मला २ मुले आहेत, या दोन्ही मुलांचा मी सांभाळ करतो." पण धनंजय मुंडेंच्या याच स्पष्टीकरणानंतर करुणा शर्मांनी पुढे, कधी फेसबुक पोस्टमधून तर कधी फेसबुक लाईव्हमधून धनंजय मुंडेंवर अनेकदा आरोप केले.
त्यानंतर आता ६ फेब्रुवारीला धनंजय मुंडेंना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण ज्या करुणा मुंडेंमुळे धनंजय मुंडे सतत अडचणीत येत असतात त्या करुणा मुंडे नक्की आहेत कोण ? करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर आतापर्यंत कोणकोणते आरोप केलेत ? धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातल्या वादाचं हे प्रकरण नेमकं आहे काय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/