महाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश. या भूमीएवढे संख्येने आणि विविधतेने नटलेले किल्ले अन्यत्र कुठेही आढळत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडकिल्ल्यांच्या बळावर स्वराज्य स्थापित केले, महाराष्ट्राचा इतिहास घडवला आणि मराठ्यांचे सौर्वभौम साम्राज्य स्थापन केले. महाराष्ट्रातील गडकोट हे आपल्यासाठी तीर्थक्षेत्रे आहेत. ती आपली धारातीर्थे आहेत. ताठ कण्याने जगावं कसं हे या गडकोटांच्या जाज्वल्य इतिहासातून आपल्याला समजते. गडकोटांचे हेच महत्व ध्यानी घेऊन बुकविश्व शिवरायांचे अज्ञात पैलु या मालिकेत पहिली मुलाखत घेतली आहे दुर्ग अभ्यासक आणि गडकिल्ले आणि मी या प्रसिध्द आणि पहिल्याकॉफिटेबल पुस्तकाचे लेखक डॉ. संग्राम इंदोरे यांची.