सलग समतल चर कसे बनवतात How to Construct CCT(Continuous Contour TRENCHES)
सलग समतल चर हा मृद व जलसंधारणाचा एक प्रभावी उपचार राबविला जातेा. यामध्ये अतिउताराच्या पडीक क्षेत्रावर समपातळी चर खोदून वृक्ष लागवड केली जाते.तिथल्या तिथे पाणी मुरविणे व मृदसंधारण करणे तसेच गायरानांची अथवा कुरणांची निर्मिती करणे हे उद्देश याद्वारे साधले जातात
संरचना
ही पद्धत सलग समतल बांधासारखी आहे. पण जेथे जमीन 25 सें. मी. पेक्षा जास्त खोल व उतार 20 टक्क्यापेक्षा कमी असतो अशा जमिनीवर या प्रकारचे चर खोदावे. या पद्धतीत कमी खोदकामात अथवा मातीकामात व जास्त पाणी साठवण्याची क्षमता आहे. परंतु ही पद्धत वर सांगितल्या प्रमाणे खोल जमिनीतच वापरली जाते. पाणलोट क्षेत्रामधील शेतीस अयोग्य असलेल्या पडीक व अवनत जमिनीमध्ये प्रामुख्याने मृद आणि जलसंधारण करण्यासाठी सलग समपातळी चर कार्यक्रम राबविला जात आहे. यामध्ये 0 ते 33 टक्के ऊताराच्या जमिनीवर 0.60 मी. रुंद व 0.30 मी. खोल तसेच 0.60 मी. रुंद व 0.45 मी. खोल या आकाराचे सलग समपातळी चर खोदण्यात येतात.
#FTIJalna
#MahaForest
#smc
#PaniFoundationVideos