MENU

Fun & Interesting

पोट साफ होत नाही का ?| इसबगोल | Isabgol| Constipation| Dr. Smita Bora

Arham Ayurved by Dr. Smita Bora 38,967 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

पोट साफ होत नाही का ?| इसबगोल | Isabgol| Constipation| Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आयुर्वेदानुसार जर अग्नी किंवा पचनशक्ती उत्तम असेल तर किरकोळ आजार होणारच नाही..... अलीकडे मी पाहते की अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना एकच समस्या आहे पचनशक्ती बिघडली आहे.... पोट साफ होत नाही....
माझ्याकडच्या जवळजवळ 80 टक्के पेशंट्स ना पोटाची काही ना काही तक्रार असते...
त्यासाठी मी अधून मधून एरंडेल तेल घेण्याचा सल्ला देते.
पण एरंडेल तेla तीक्ष्ण आहे म्हणजे त्यामुळे दोन ते तीन जुलाब होऊ शकतात ते आपण रोज घेऊ शकत नाही.
आणि ज्यांना खूप जुनाट बद्धकोष्ठ आहे त्यांना त्रिफळा चूर्ण थोडे सौम्य वाटते म्हणजे एक चमचा घेतला तरी पोट पुरेसे साफ होत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार असू शकते.

म्हणून यासाठी काहीतरी मध्यम मार्ग हवा.... ज्यामुळे पोट व्यवस्थित साफ होईल..... आणि हाच आपला आजचा विषय आहे....
इसबगोल.....
निसर्गाने माणसाला दिलेल्या अनेक गुणकारी औषधांपैकी ही एक आहे. अनेक ठिकाणी याला सुपर फूड किंवा सुपर मेडिसिन सुद्धा म्हटले जाते. हे नैसर्गिक आहे. यामध्ये कोणताही केमिकल नसतो आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत. आपल्या आरोग्यासाठी हे खरंच एका वरदानापेक्षा कमी नाही. आणि इसबगोलचा आपल्या देशात शतकानुशतके उपयोग केला जात आहे. इसबगोल हे एक वनस्पतीचे बीज असून .... औषधांमध्ये याचा वापर केला जातो.

इसबगोल म्हणजेच Plantago ovata ही औषधी वनस्पती आहे. तिच्या बियांना "इसबगोलचे बी" म्हणतात आणि त्या बियांवर असलेल्या सालीला "इसबगोलची भुसी" किंवा "इसबगोलचा साल" म्हणतात. इंग्रजीत याला Psyllium husk म्हणतात आणि याचे आयुर्वेदिक नाव आहे अश्वगोल.

या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इसबगोलचे काही शास्त्रशुद्ध असे १५ पेक्षा अधिक फायदे सांगणार आहे. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की एवढे सगळे अमेझिंग आरोग्यदायी फायदे या इसबगोलमध्ये दडलेले होते आणि आपल्याला आजवर त्याची कल्पना सुद्धा नव्हती. पण आज समजणार आहे.
आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघाच, कारण अर्धवट माहिती धोकादायक असते. जर तुम्ही पूर्ण पाहाल, तरच तुम्हाला समजेल की इसबगोलचा उपयोग कसा करायचा आहे, किती प्रमाणात करायचा आहे, कोणत्या आजारासाठी कोणत्या प्रकारे वापरायचा आहे, आणि कोणत्या लोकांनी याचा वापर करू नये.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
https://www.youtube.com/playlist?list=PLLAEjatkQbNuvWjRYezpj-pDnwxn7LE6K

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.

डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.

प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .

----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
https://youtube.com/playlist?list=PLLAEjatkQbNuvWjRYezpj-pDnwxn7LE6K

follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9607509032
For online consultation Whatsapp on 9607509032


Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora

Comment