#BolBhidu #KhasBagMaidan #KeshavraoBhosaleNatyahruh
कोल्हापूरचं सांस्कृतिक वैभव अशी ओळख असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली. नाट्यगृहासोबतच महाराजांनी कुस्तीसाठी उभारलेलं भव्य खासबाग मैदानही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं. केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान, या दोन्ही वास्तू एकमेकाला लागून असल्यामुळं या दोन्ही वास्तूंचं मोठं नुकसान झालंय. शाहू महाराजांनी त्याकाळी लाखो रुपये खर्चून हे मैदान उभारलं होतं. युरोपीयन मैदानांनाही लाजवेल असं हे मैदान होतं.
अलीकडच्या काही वर्षात याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचे आरोप करण्यात येत होते. अशात आता आगीमुळे खासबाग मैदानाचं उरलंसुरलेलं वैभवही जळून खाक झालंय. या मैदानाच्या पुनर्निर्मितीसाठी सरकारनं निधीची घोषणा केलीय. येत्या काळात पुन्हा है वैभव उभारण्याचा प्रयत्न होईल. पण शाहू महाराजांना जे जमलं होतं, ते आताच्या प्रशासनाला जमेल का? हा मोठा प्रश्न आहे. शाहू महाराजांनी हे मैदान कसं उभारलं? त्यासाठी काय प्लॅनिंग केलं? त्यांना कुस्तीचं मैदान उभारण्याची कल्पना कशी सुचली? पाहुयात या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/