कोळदुर्ग किल्ला आणि रहस्यमयी शिलालेख | Koldurg Fort Sangli
कोळदुर्ग आणि बाणूरगड हे दोन किल्ले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेले आहेत. यातला बाणूरगड (भुपाळगड) किल्ला छ्त्रपती संभाजी राजांनी मुघलांच्या फ़ौजांच्या सहाय्याने जिंकल्यामुळे इतिहात प्रसिध्द आहे. पण त्याच्या जवळ असलेला कोळदुर्ग मात्र अपरिचित आहे. कोळदुर्गावरील अवशॆषांची पण वाताहात झालेली आहे. किल्ल्यावरील मंदिराचे अवशेष वापरुन पळशी गावातील सिध्देश्वराचे मंदिर बांधलेले आहे.
कोळदुर्ग किल्ल्याजवळ असलेले शुकाचार्यांचे मंदिर आणि परिसर या भागात प्रसिध्द आहे. वर्षभर याठिकाणी लोकांचा राबता असतो, पण त्याला लागूनच असलेला कोळदुर्ग किल्ला मात्र दुर्लक्षित राहीलेला आहे. पळशीचे सिध्देश्वर मंदिर, शुकाचार्य मंदिर, कोळदुर्ग आणि बाणूरगड ही ठिकाणे खाजगी वहान असल्यास एका दिवसात पाहाता येतात.
@चोहीकडे