#BolBhidu #KrishnaAndhale #SantoshDeshmukhCase
'वाघ्या, लय मारलाय. आता बास करा सरपंचाला मारायचं', ही वाक्य आहेत मोकारपंती व्हॉट्सअप ग्रुपमधल्या एका सदस्याची. देशमुखांना मारहाण करताना आरोपी कृष्णा आंधळेनं या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी एका सदस्यानं आंधळेला मारहाण थांबवा, असा सल्ला दिला होता. पण कृष्णा आंधळे थांबला नाही, व्हिडीओ कॉल करायचाही आणि मारायचाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे सिद्ध करण्यासाठी डिजिटल पुरावे महत्त्वाचे ठरलेत. त्यात आरोपींनी केलेले कॉल डिटेल्स, देशमुखांना मारहाण केल्याचे व्हिडिओ आणि फोटोंचा सहभाग आहे. यासह आरोपींनी मोकारपंती या व्हॉट्सअप ग्रुपवरही व्हिडिओ कॉल करून मारहाणीचा प्रकार Live दाखवल्याची माहितीही चार्जशीटमधून उघड झालीये.
दरम्यान, देशमुखांची हत्या झाल्यापासून मोकारपंती या व्हॉट्सअप ग्रुपची चर्चा आहे. या ग्रुपवर आरोपींनी व्हिडिओ कॉल केल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं या मोकारपंती ग्रुप नेमका कोणाचा आहे, कृष्णा आंधळे त्यावर व्हिडिओ कॉल केल्यानंतर काय म्हणाला होता, ते व्हिडिओ कुणी पाहिले, त्यांच्यावर कारवाई होणार का आणि सगळ्या आरोपींवर मोक्का लागला, मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला तरी कृष्णा आंधळे का सापडला नाही ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/