#BolBhidu #BhaiyyajiJoshi #Ghatkopar
मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. त्या त्या ठिकाणची भाषा असते. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांचं हे वक्तव्य सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतंय. ५ मार्चला घाटकोपरमधल्याच विद्याविहार इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं, त्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि जोशी यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. विरोधकांनी तर जोशींना चांगलंच धारेवर धरलं.
उद्धव ठाकरेंनी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली, तर अगदी सभागृहात सुद्धा हा विषय गाजला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज ठाकरे असतील अनेक नेत्यांनी जोशींच्या या विधानाबद्दल वेगवेगळ्या भूमिका मांडल्या आहेत. स्वतः भैय्याजी जोशी यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. पण घाटकोपरची भाषा गुजराती असं विधान ज्या घाटकोपरमधून करण्यात आलं, त्या घाटकोपरचा इतिहास काय ? घाटकोपरला गुजराती माणसं आली कशी ? घाटकोपरनं मिनी गुजरात ही ओळख कशी मिळवली, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/