MENU

Fun & Interesting

Kumbh Mela 2025: 27 वर्षांपूर्वी यादव कुटुंबातून निघून गेला, कुंभमेळ्यात अघोरी Rajkumar Baba झाला ?

BolBhidu 25,788 lượt xem 1 month ago
Video Not Working? Fix It Now

#BolBhidu #MahaKumbh2025 #RajkumarAghoriBaba

कुंभ के मेले मे मेरा भाई बिछड गया, वो सोहन मैं मोहन... सोल्जरमधला जॉनी लिव्हरच्या या डायलॉगवर आपण खूप हसलो होतो. आता भाई बिछडायला एकतर गावात जत्रा असावी लागते नाहीतर मग कुंभमेळा, टिपिकल बॉलिवूड पिक्चरमध्ये आपण हेच बघत आलोय. आता असं खरंच होतं की नाही हा फॅक्ट चेकचा विषय झाला. पण आता प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभमेळ्यात मात्र एका बायकोला २७ वर्षांपूर्वी हरवलेला आपला नवरा सापडलाय. कुंभमेळ्यात अघोरी बाबा म्हणून वावरत असलेला माणूस हा आपला नवरा असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे.

पण तिचा हा दावा खोटा असल्याचं त्या अघोरी बाबाचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर त्या बाबासोबत असलेल्या साध्वीनं हा आपला नवरा असल्याचं सांगत संबंधित महिलेला तिथून हाकलून दिलं. त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेल्या कुंभमेळ्यात आता वेगळाच फॅमिली ड्रामा पहायला मिळतोय. कुंभमेळ्यातला हा अघोरी बाबा आहे कोण, हा बाबा आपला नवरा आहे असं म्हणणाऱ्या महिलेचा आणि तिच्या कुटुंबीयांचा दावा काय आणि या सगळ्याबद्दल बाबा आणि साध्वीचं म्हणणं काय, त्याचीच स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Comment