अनुताप
माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तो चुकतो हि त्याची चूक नाही, पण चूक कबूल करत नाही हीच त्याची खरी चूक आहे. काळात नकळत घडलेल्या अपराधांचे डाग आत्मस्वरुपावर लागलेले असतात. त्यामुळे आत्मा जड व दुबळा होतॊ. घडलेल्या पापांचं शल्य सतत बोचत राहतं त्या अपराधांचं क्षालन झालं कि, कास हलकं हलकं वाटतं. अध्यात्माने त्यावर प्रायश्चित हा उपाय संगीताला आहे. सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरासमोर खुल्या मानाने अनंत जन्माचे अपराध स्वीकार करणे हा सर्वोत्तम उपाय .
अंतःकरणाच्या तळात पश्च्यातापाचा गहिवर निर्माण झाला कि हृदयाला पीळ बसतो. अन डोळ्यातून झाकण अश्रू येतात.
अनुतापाच्या वेलीला आलेलं हेच तर खरं फूल आहे. त्यातच तर असते हृदयाची कोमलता व भावनेचा सुगंध....
बा. भो. शास्त्री