MENU

Fun & Interesting

Pitru Paksh Unknown Facts : पितृ पक्ष म्हणजे म्हाळाचा पंधरावडा कसा सुरु झाला ? | Vishaych Bhari

Vishaych Bhari 5,393 lượt xem 5 months ago
Video Not Working? Fix It Now

Pitru Paksh Unknown Facts : पितृ पक्ष म्हणजे म्हाळाचा पंधरावडा कसा सुरु झाला ? | Vishaych Bhari

मंडळी सध्या सगळीकडे म्हाळाचा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष पंधरवडा सुरु आहे. पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. मध्य प्रदेश आणि पौर्णिमान्त महिने पाळणाऱ्या प्रदेशांत हा आश्विन महिन्यातील पहिला पंधरवडा असतो. याला 'महालय' असही म्हणतात. आपल्या नातेवाइकाचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल, त्या नातेवाइकाचं श्राद्ध, पितृपक्षातील त्याचं तिथीला करण्याची आपली हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने श्राद्ध घालून आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात-अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पंधरवड्यात यमलोकातून आपले पितर म्हणजेच आपले मृत पूर्वज आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पंधरवडा अशा पितृकार्याला योग्य समजला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याची परंपरा आहे. एकूणच पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना आनंद होईल अशी वर्तवणूक करणे हे त्या पितरांच्या वंशजांचे कर्तव्य आहे अस धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । म्हणजेच देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा देखील आदेश आहे. म्हणूनच मग या निमित्ताने आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हाळाचा पंधरवडा म्हणजेच पितृ पक्ष कसा सुरु झाला ? याबाबतीत पुराणात काय सांगितलं गेलं आहे ? पितृपक्षात कोणत्या गोष्टी दान केल्या पाहिजेत कोणत्या नाही हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#pitrupaksh2024
#pitrupaksha
#vishaychbhari
#विषयचभारी

pitru paksha 2024,pitru paksha 2024 dates,pitru paksha,pitru paksha 2024 kab se hai,pitru paksha 2024 date,pitru paksha 2024 start date,pitru paksha news,pitru paksha puja,shradha paksh 2024 date,2024 pitru paksha,pitra paksh ke niyam,pitru paksh 2024,pitru paksha kab se shuru hai 2024,pitru paksh ki kahani,pitru paksha 2024 all dates,pitra paksha 2024,pitru paksh ki pauranik kahani,pitra paksh ki kahani,pitru paksha 2024 tithi

Comment