#BolBhidu #WalmikKarad #SantoshDeshmukhCase
"अरे ते काम बंद करा, ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले त्या परिस्थिती ते बंद करा. अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील. काम चालू केले तर याद राखा" या भाषेत वाल्मीक कराडनं, आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं होतं. कराडनं ही धमकी 29 नोव्हेंबरला विष्णु चाटेच्या फोनवरून दिली होती. त्यानंतर 6 डिसेंबरला संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केला. त्यावेळी सुदर्शन घुलेनं देशमुखांना धमकी दिली होती. तसेच कराडनंही आपल्या गँगला, खंडणीत जो आडवा येईल त्याला आडवा करा, असं सांगितलं होतं. त्यातूनच आरोपींनी देशमुखांची हत्या केल्याचं चार्जशीटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.
त्यासाठी महत्त्वाचा असलेला चाटेचा फोन हाती लागला नसला तरी CID, SITनं वाल्मीक कराडसह इतर आरोपींचे फोन तपासलेत. त्यातून देशमुखांना मारहाणीबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. असं असलं तरी आता कराडला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होतोय. त्यामुळं कराड आणि इतरांच्या फोनमधून नेमकं काय समोर आलंय, कराड एक नंबरचा आरोपी असतानाही त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला जातोय का, हेच या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/