पोलीस कॉन्स्टेबलचा पोरगा Dawood Ibrahim अंडरवर्ल्डचा सर्वात खतरनाक डॉन कसा झाला ?
१९४० च्या आसपास २१ वर्षाचा करीम लाला हा अफगाणिस्तानी पठाण पैसे कमवण्याची जबरदस्त इच्छा घेऊन मुंबईत आला. आल्यानंतर काही काळ त्यानं नीतीनेमानं कामं केली पण जेवढा पैसा त्याला हवा होता तेवढा काय त्याला त्या कामातून मिळत नव्हता. मग गड्यानं दोन नंबरच्या धंद्यात उतरून दारू तस्करी सुरु केली. पुढं त्या कामाचा आवाका वाढवण्यासाठी त्यानं स्वतःची एक gang सुद्धा बनवली. त्या gang मार्फत त्येनं खंडणी, अवैध दारूविक्री, हिऱ्यांची तस्करी, जुगाराचे अड्डे सुरु केले. ती मुंबईत अंडरवर्ल्डची सुरुवात होती. १९५० सालापर्यंत मुंबईत अंडरवर्ल्डनं महाकाय स्वरूप प्राप्त केलं. कारण तिथून पुढं म्हणजे साधारण १९५० पासून १९७० पर्यंत करीम लालाच्या जोडीला हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार हे आणखी दोन डॉन जोडले गेले आणि त्या तिघांनी मिळून मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगतावर एकहाती सत्ता ठेवली. पण ७०- ८० च्या दशकात साबीर इब्राहीम कासकर आणि दाऊद इब्राहीम कासकर नावाच्या दोन भावांनी अंडरवर्ल्डमध्ये शिरकाव केला आणि पुढच्या काही दिवसातचं त्यांनी करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन यांनी बनवलेल्या सत्ता साम्राज्याला कायमचा सुरुंग लावला. साध्या चोरीपासून लोकांच्या हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारी क्षेत्रातला एकही असा गुन्हा नाही जो दाऊदच्या नावावर लागला नाही. अगदी भारतावरचा राग काढण्यासाठी त्यानं पाकिस्तानसोबत मिळून मुंबईवर १३ ठिकाणी बॉम्बहल्ले सुद्धा केले ज्यामध्ये शेकडो मुंबईकरांना त्यांचा जीव गमवावा लागला. बॉलीवूड कलाकार आणि क्रिकेटर्स सोडा अगदी काही पोलीस अधिकारी आणि राजकारणी लोकं सुद्धा दाऊदच्या शब्दाला मान द्यायचे असं म्हणतात. दाऊदनं त्याच्या प्रत्येक दुश्मनाला एकतर आपल्या बाजूनं वळवलं किंवा मग त्याला कायमच संपवलं. त्याच्या क्रूर कृत्याचे शेकडो साक्षीदार आजही मुंबईमध्ये पाहायला मिळतात. पण एका साध्या पोलीस कॉन्स्टेबलच्या पोरानं कशाच्या जीवावर त्याचं एवढं मोठं साम्राज्य उभं केलं होतं ? मुंबई पोलिसांवर जे आरोप केले जातात की त्यांनी सुरुवातीच्या काळात दाऊद बाबतीत कठोर पाऊल उचलली नाहीत म्हणून दाऊदला हातपाय पसरायला मदत झाली त्यात खरच तथ्यय का ? दाऊदच्या या ओव्हरऑल गुन्हेगारी कारकिर्दीचा आढावा घेतलाय क्राईम रिपोर्टर आणि प्रसिद्ध लेखक हुसैन जैदी यांनी. त्यांच्या डोंगरी त्ये दुबई या पुस्तकातून. आजच्या या व्हिडीओमध्ये आपण दाऊद इब्राहीम कासकर याचा मुंबईत उदय कसा झाला आणि पुढं जाऊन तो इंटरनॅशनल कीर्तीचा डॉन कसा बनला याबद्दलची काही तथ्य जाणून घेणारे...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh...
Our Website :
https://vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#dawoodibrahim
#dawoodibrahimstory
#dawoodibrahimstatus
#dawoodibrahiminterview
#dawoodibrahimmovie
#dawoodibrahimcallrecord
#dawoodibrahimvideo
#dawoodibrahimattitudestatus
#dawoodibrahimlatestnews
#dawoodibrahimvoice
#dawoodibrahimsister
#dawoodibrahimkikahani
#arungawli
#arungawlihistory
#arungawlimovie
#arungawliinterview
#arungawlistatus
#arungawlisong
#arungawlistory
#arungawlilatest news
#arungawlivsdawoodibrahim
#arungawlidaddy
#arungawlidialogue
#arungawliwife
#arungawlifamily
#arungawlidaughter