*माझं गाव*
*गाव मांझ चिरनेर*
*दोस्ता एकदा तरी पाहून जा...!
*वरदान निसर्गाच काय असत*
*एकवेळ तरी अनुभवन जा ...!!
*हात मस्तकावर सदैव ज्याचा*
*तो श्री महागणपती पाहून जा..!
*असो सर्व जाती धर्माचे लोक येथे
*एकात्मता आमची पाहून जा...!!
*कला क्रीडा सामाजिकतेचा ठेवा आमुचा..!
*नाट्यकला आमुची पाहून जा..!!
*इतिहास घडविणारी माणसं इथली
*हुतात्म्यांना वंदन करून जा.!
*इतिहास प्रसिद्ध या चिरनेर *गावची भेट एकदा घेऊन जा...
माझ चिरनेर ..
गाव छोटस पण नाव आभाला ऐवढ मोठ
याच गावात स्वातंत्र्याचे धडे गिरवले
आणि २५ सप्टेंबर १९३० रोजी
चिरनेर जंगल सत्याग्रह झाला
आणि हुतात्म्यांचा गाव साऱ्या
हिंदुस्तानात प्रचलित आलं व भारताच्या
इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले
गाव छोटसं पण नाव आभाला एवढा मोठा
याच गावाचे दुसर्या महायुध्दात देखिल
सहभाग मोलाच होत म्हणून पुढे
स्वातंत्र्यसैनिकांचा देखील चिरनेर गाव
ओळखलं जातं
याच गावला पेशवेशाहि देखिल लाभलि त्यातलच पेशवेकलिन श्री श्रेत्र महागणपती च एक जाग्रुत देवस्तान
साऱ्या पंचक्रोशीत नवसाला पावणारा महागणपती म्हणून एक वेगळीच ख्याती चिरनेर गावाची निर्माण झाली आहे