नमस्कार मंडळी,
मी प्रिया पवार.साधी गृहिणी आहे.माझ्या स्वयंपाक घरात जे पदार्थ मी तयार करते ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे.मी मालवणी कुटुंबातून आहे.माझे शिक्षण फार कमी झाले आहे.स्वयंपाक देखील मी बघूनच शिकले आहे.पण स्वयंपाकाची खुप आवड आहे.तर कोणताही पदार्थ बनवताना मनापासून केला तरच तो पदार्थ स्वादिष्ट बनतो.असे माझे मत आहे.मनापासून स्वयंपाक करणे आणि केलेला स्वयंपाक प्रेमाने वाढणे याची मला खुप आवड आहे. स्वयंपाक करताना आपण बायका अनुभवाने खुप काही शिकतो.काही वेळा पदार्थ फसतो. पदार्थ फसला तरीही , तो फेकून न देता त्यातूनही आपण नवीन पदार्थ तयार करतो. अन्न वाया न घालवता त्यातून वेगळा विचार करून योग्य पदार्थ तयार करणारी हीच खरी अन्नपूर्णा असते.
तर सांगण्याचा उद्देश आहे की मी सुद्धा अशाच छान रेसिपी, माझे आयुष्य कुठेतरी तुमच्याशी शेअर करणार आहे. नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे.माझ्यासाठी सोशल मीडिया हे जग खुप नवीन आहे.काहीच अनुभव नसताना या जगात पाऊल टाकत आहे.
Business inquiry
pawarkunal998@gmail.com
What's up
9167260765
Business inquiry
8369128907