नमस्कार उद्योजक मित्रांनो,
आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड टेकाळे या गावातील वंदना बबन टेकाळे यांनी सुरू केलेला भाजीपाला प्रक्रिया उद्योगाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत.वंदना टेकाळे या अल्पभूधारक शेतकरी महिला असून स्वतःच्या दोन एकर शेतीतल्या भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतीतला उत्पादन खर्चही निघत नाही, या कारणाने त्यांनी भाजीपाला प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली. वंदनाताई यांच्याकडे प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने निर्जलीकरण यंत्र, पावडर निर्मिती यंत्र, भाजीपाला कटिंग यंत्र आणि पॅकिंग यंत्रणा उपलब्ध आहे, प्रामुख्याने कांदा, टोमॅटो, आद्रक,काकडी,बटाटा आदीच्या पावडर निर्मितीवर त्यांचा भर आहे. सुरुवातीला सर्व पालेभाज्या स्वच्छ धुऊन घेतल्या जातात, त्यानंतर छोट्या स्वरूपात काप करून, निर्जलीकरण यंत्रामध्ये वाळवण्यासाठी ठेवल्या जातात.
भाजीपाल्याच्या क्षमतेनुसार तो वळवला जातो, भाजीपाल्यामधील आर्द्रता कमी झाल्यानंतर पावडर यंत्राद्वारे पावडर केली जाते, साधारणपणे दहा किलो कांदा किंवा टोमॅटोला एक किलो पावडर तयार होते.
तयार तयार झालेली पावडर 50 ग्रॅम ते एक किलोपर्यंत पॅक केली जाते. ही पावडर स्थानिक मसाला उद्योगांना आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट यांना कच्चामाल म्हणून वितरित केली जाते, या पावडरचा दर्जा उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना आता इतर जिल्ह्यातूनही मागणी येत आहे. सध्या घरगुती पातळीवर असलेला त्यांचा हा व्यवसाय पाच महिलांना रोजगार देण्यासोबत 40 ते 50 हजार रुपयांचा आर्थिक मोबदला देत आहे. वंदनाताई यांचा स्टार्टअप कसा वाटला प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा ..
Factory Address:Bharat Agrritech,G-32,MIDC,
LATUR WhatsApp Number :- 9987373311
#भाजीपालाप्रक्रियाउद्योग
#vegetabledehydrationbusinessinmarathi
#dehydratedvegetablesbusiness
#howtostartdehydratedfoodbusiness
#कृषीउद्योगमाहिती
#कृषीप्रक्रियाउद्योग
____________________________________________
भाजीपाला प्रक्रिया उद्योग
फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग
कृषी उद्योग माहिती
कृषी प्रक्रिया उद्योग
शेतमाल प्रक्रिया उद्योग
प्रक्रिया उद्योग
प्रक्रिया उद्योग माहिती
सुकवलेला भाजीपाला
भाजीपाला डीहायड्रेशन मशीन
भाजीपाला प्रोसेसिंग युनिट
भाजीपाला निर्जलीकरण
सौर भाजी ड्रायर
भाजीपाला निर्जलीकरण
घरगुती व्यवसाय महिलांसाठी
घरगुती व्यवसाय
उद्योग भरारी
____________________________________________
business ideas marathi
business ideas marathi 2023
small business ideas marathi
gharguti business
gharguti vyavsay
gharguti vyavsay in marathi
Udyog bharari
vegetable dehydration business in marathi
vegetable dehydration process
vegetable business ideas
____________________________________________
उद्योजिका :- वंदना बबन टेकाळे
मु.पो. रुईखेड टेकाळे तालुका बुलढाणा जिल्हा बुलढाणा
संपर्क क्रमांक :- 76202 82644
____________________________________________
"उद्योग भरारी" यूट्यूब चैनल संपर्क क्रमांक :- 7972657986
____________________________________________