गांडूळ खत, कंपोस्ट खत कसे बनवावे व त्यासाठी कोणती काळजी घ्यावी...
शेतीनिष्ट शेतकरी रामचंद्र किसनराव शिंदे
Shetkari Ramchandra Kisanrao Shinde
गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे. हा प्राणी द्विलिंगी आहे. गांडूळ जैविक पदार्थाचे सुपीक मातीत रूपांतर करतो. जमीन भुसभुशीत करतो. त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्याचा मित्र' देखील म्हणतात...
गांडूळ तयार करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्यामुळे छप्पर तयार करण्यात यावे.
गांडूळ खताचे फायदे :
1) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
2) जमिनीची धूप कमी होते.
3) बाष्पीभवणाचे प्रमाण कमी होते.
4) जमिनीचा पी एच योग्य पातळीत राखला जातो.
5) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व
तिला उत्तम प्रतीची बनवतात.
6) गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण जास्त
असल्यामुळे नत्र, स्फुरद आणि पालाश व ईतर
सुक्ष्मद्रव्य भरपुर व तात्काळ उपलब्ध होतात.
7) जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर
वाढ होते.
8) मातीचा कसं टिकून राहतो.
9) या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून
राहतात.
#KampostKhat #गांडूळखतनिर्मिती #वर्मीकम्पोस्ट
...............................................................................
Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
...............................................................................