माझ्या सासरोडचा पाहुणचार 😍 | मुंबई जायच्या अगोदर सासरोडी भेट - Sakhari, Mandangad (Konkan) आम्ही गावी गेलो की सासरोडी जातोच. गावावरून मुंबईला यायचं असलं की पुन्हा एकदा आमचं सासरोडी साखरी जाणं होतं. आम्ही लवकरच मुंबईला येणार म्हणून आम्ही साखरी गावी गेलो होतो. वर्षा माहेरी जायची असली की जाम खुश असते. मुलं सुद्धा खूप खुश असतात. आम्ही सकाळी लवकर साखरी जायला निघालो. पाऊस दिवसभर लागतो. आम्ही गाडी असल्यामुळे गाडीने गेलो नाहीतर पूर्वी आम्ही चालत साखरी गावी जायचो. आमच्या गावापासून साखरी हे गाव पाच किलोमीटर आहे. मंडणगड तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनारी वसलेलं हे गाव अतिशय छोटंसं आणि सुंदर गाव आहे. पावसाळ्यात कोकणातील गावाचं रूप बघण्यासारखं असतं. आम्ही सासरोडी गेलो की मामींची जेवणाची तयारी सुरू होते. सासरोडी गेलो की मुलीसाठी आणि जावयासाठी खास कोकणी पाहुणचार असतो. आम्ही साखरीला गेलो तेव्हा मामींनी बाणकोटवरून चिकन आणले होते. आम्ही जाताना अंडी घेऊन गेलो होतो. वर्षाने माहेरी जाऊन जेवणाची सर्व तयारी केली. गोडामसाला पाट्यावर वाटून तयार केला. चिकन बारीक करायचं काम मी केलं. आम्ही साखरीला सासरोडी आलो की जेवण वर्षा आणि मी मिळून करतो. कधी कधी वर्षाची बहीण सुद्धा माहेरी येते. गावाकडं पाहुण्यांचा पाहुणचार कोकणी पद्धतीने कसे करतात हे पाहायला मिळणार आहे. प्रदनु प्रांजू मामाच्या गावी गेले की खूप खेळतात. आम्ही दुपारी सर्वजण पंगतीने बसून जेवण केले. दुपारी थोडा आराम करून गावातील नातेवाईकांकडे गेलो. साखरी गावात सगळीच माणसे आमच्या नात्यातील आहेत. आम्हाला एक दिवस पुरतच नाही. आम्ही गाव फिरून आल्यावर संध्याकाळी निघण्याची तयारी केली. आम्ही मुंबईला लवकर जाणार तर सासरोडी भेट देऊन आलो. आता मुंबईवरून गावी जाऊ तेव्हा पुन्हा आमचं सासरोडी जाणं होईल. तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या सासरोडचा पाहुणचार दाखवला आहे. माझं सासरोडचे गाव कसे आहे ते दाखवले आहे. वर्षाने चिकन सूक्का, कोंबडी वडे, सागोती बनवली आहे ते दाखवले आहे. वर्षांचे माहेरचे घर कसे आहे ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #MazyaSasrodchaPahunchar #ChickenSukka #KokaniPahunchar #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
https://www.facebook.com/koknatlamumbaikar
https://www.instagram.com/koknatlamumbaikar