MENU

Fun & Interesting

कोकणातील एक अविश्वसनीय प्रथा ' गावपळण ' । गाव झालं ओसाड वसलं वेशीबाहेर झोपड्यात । चिंदर,आचरा ।भाग -1

Sanchit Thakur Vlogs 73,482 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

कोकणातील एक अविश्वसनीय प्रथा ' गावपळण ' । गाव झालं ओसाड वसलं वेशीबाहेर झोपड्यात । चिंदर,आचरा ।भाग -1

कोकणात आजही अनेक प्रथा परंपरा जाणीवपूर्वक आणि मनापासून जपल्या जातात . मुळात कोकण हा प्रथा परंपरा भरलेला प्रदेश आहे ,वळणावळणांवर आपल्याला विविधता पहायला मिळते.कोकणातील काही प्रथा,परंपरा अश्या आहेत की त्या आपल्याला अचंबित करून टाकतात,काही अविश्वसनीय तर काही गूढ रहस्यमय . अशीच एक कोकणातील शेकडो वर्षांपासून चालत आलेली परंपरा ती म्हणजे 'गावपळण' . कोकणात आजही ही परंपरा गावकरी श्रद्धेने आणि आनंदी होऊन पाळतात . कोकणात मालवण तालुका मध्ये चिंदर ,वायंगणी आणि आचरा तसेच देवगड तालुका मध्ये मुणगे आणि वैभववाडी मध्ये शिराळे गावात गावपळणी होतात. गावपळण म्हणजे काय तर गावपळण म्हणजे गावातून पळून जाणे आणि जंगलात गावाच्या वेशी बाहेर राहणे. आपलं नेहमीच राहतं घर सोडून,आपला संसार घेऊन निघून जाणे . कोंबडी ,कुत्रे मांजरी ,गुरेढोरे इतर पाळीव पक्षी प्राणी सोबतच आपल्याला 3,4 दिवस पुरेल एवढं ध्यान ,जीवनावश्यक वस्तू ,कपडे, सामान हे घेऊन घरातून बाहेर पडायचं. गावपळणीचा कालावधी 3 दिवस 3 रात्रीचा असतो आणि या दरम्यान गावात कोणीही प्रवेश करत नाही.
आपण जी गावपळण अनुभवणार आहोत ती आहे चिंदर गावची गावपळण गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि गावपळणीचा कौल देणारा देव श्री देव रवळनाथ.रवळनाथ देवाने कौल दिला की गावातील लोक पाळणीच्या तयारीला लागत . चिंदर मध्ये दर 3 वर्षांनंतर गावपळण होते.कालावधी असतो 3 दिवसांचा . चिंदर गाव पहिलं ओसाड गाव म्हणून ओळखलं जातं होत.गावपळणीची तयारी सुरू झाली की लोक गावाच्या वेशीबाहेर झोपडी बांधायला लागतात.झोपड्या मजबूत असणे गरजेचे असतं.चिंदर गावची गावपळण ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान असते आणि तेव्हा खूप थंडी देखील असते त्यामुळे झोपड्या हवेपासून सुरक्षित असणं गरजेचं असतं.गावपळणीच्या दिवशी रवळनाथ देवाच्या मंदिरात देव घडी आणि गाऱ्हाणे घातल्यावर लोक आपल्या राहत्या घराच्या दरवाजावर माडाच्या झावळ्या (नारळाच्या झाडाच्या झावळ्या ) लावून घरच्या भोवती आणि गुरांच्या गोठयात राख टाकून. आपलं घर ,आपलं गाव चिंदर वासी ओसाड करून गावाच्या वेशीबाहेर निघून जातात . गजबजनाऱ्या गावात अचानक स्मशानशांतात पसरते . आपलं घर ,आपलं गाव देवाच्या विश्वासावर सोडून निघून जातात.मनात कसली शंका नसते कारण गावकरी देवावर विश्वास ठेवतात.
गावपळणी च्या या 3 दिवसामध्ये काहीही काम करायचं नसतं फक्त जेवण बनवायचं ,जेवायचं आणि आराम करायचा एवढंच ...
गावपळणी च्या या निमित्ताने सर्व लोक एकत्र येतात मनोरंजसाठी दिंडी,फुगड्या, संगीत खुर्ची असे अनेक कार्यक्रम करतात .लहान मुलांची तर मज्जा असते. या 3 दिवसांमध्ये लोक एकत्र येतात ,आपल्या परिवारासोबत , आपल्या समाजासोबत वेळ घालवतात. मनातील सर्व भेदभाव ,भांडण विसरून एकत्र राहतात.छोट्याच्या झोपड्यात(खोपट्यात) खाली शेणाने सारवलेली जमीन आणि वर फक्त प्लास्टिक कागद,एक छोटीशी चूल एवढंच ... पण तरीही गावकरी आनंदने राहतात अगदी चाकरमानी देखील यात सहभागी होतात. गावपळणीच्या अनेक कथा सांगितल्या जातात(भुतांचा वावर),अनेक वैज्ञानिक दृष्टिकोन देखील सांगितले जातात(गाव स्वच्छ होतो,रोगराई दूर होते, जुन्या काळात मोठे आजार असायचे त्यावर नियंत्रण म्हणून अस केलं जातं) अस खूप काही आहे आणि ते बरोबर देखील असेल पण एक मात्र आपल्याला या गावळणीतुन स्पष्ट दिसत ते म्हणजे ' एकोपा, एकजूट ' आपल्या माणसांचं आपल्या जीवनातील महत्व आपल्या समाजाचं,आपल्या गावाचं आपल्या जीवनातील महत्त्व . पूर्वजांनी चालू केलेली ही शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही गावपळणी ची परंपरा अशीच चालत राहो .... माझ्या मामाच्या गावची ,चिंदर गावची मी अनुभवलेली ही गावपळण मी कधीच विसरू शकत नाही. तुम्हीही कधीतरी हा अनुभव नक्की घ्या .....


Follow us -

Email - sanchitthakurvlogs@gmail.com

Instagram
https://www.instagram.com/sanchitthakurvlogs__

Facebook - https://www.facebook.com/SanchitThakurVlogs

SnapChat -
https://www.snapchat.com/add/sanchit_vlog

Telegram -
https://t.me/Sanchit_Thakur_Vlogs




#chindargavpalan #चिंदरगावपळण

Comment