मंडळी नमस्कार ,
सर्वात प्रथम आपणा सर्वांचे आभार कारण आपल्या प्रेमामुळे आपले चॅनेल उत्तम प्रकारे वाढत आहे .
आज या शाब्बाथ दिवसाच्या निमित्ताने आज पुन्हा एकवार आपल्या भेटीसाठी नवीन भजन घेऊन येत आहोत . प्रभू येशूला धरून देण्यात आलं नंतर पिलातापुढे त्याची चौकशी केली , पेत्रानेही प्रभूला नाकारलं या सर्व बाबींवर आधारित होता देव तो महान नाही तुम्हा त्याची जाण असता शिष्य प्रिय तुम्ही त्याचे झाले रे बेईमान हे भजन सादर करीत आहोत .
गायक - बंधू दिनकर खरात
पखवाज - योहान गजभिवं
कोरस - सर्व भजन मंडळी सभासद .
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
भजनाचे बोल
होता देव तो महान , नाही तुम्हा त्याची जाण
असता शिष्य प्रिय तुम्ही त्याचे झाले रे बेईमान
धिकारीला विधात्याला प्रभूच्या त्या शब्दाला ।।धृ।।
भोजन घेण्या त्या वेळेला सांगितले त्याने शिष्याला
तुमच्यातीलच एक शिष्य पकडून देईल मजला
प्रभू कोण कुठला , नाही माहीत मजला(२)
खोटे बोलून तयाने त्याचा केला अपमान ... ।।१।।
न्याय करण्या प्रभू देवाचा , पिलातापुढे प्रभू नेला
चौकशी करता पेत्रसाला , नाकारले त्याने प्रभूला
प्रभू कोण कुठला , नाही माहीत मजला(२)
खोटे बोलून तयाने त्याचा केला अपमान।।२।।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
संपर्क क्रमांक
शलमोन साळवे- 9112267029
योहान गजभिवं- 9822627388