टोमॅटो रोप लागण झाल्यानंतर 21 ते 30 दिवसात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे कारण रोपाचा विकास होतो , रोपाची वाढ जोमदार होते व फुटवा निघण्यास जोर लागतो काळजी पूर्वक करा....
या प्लॉट मध्ये आपण गावरान प्रकारातील 440 जातीचा टोमॅटो लावला आहे
प्लॉट ला बॉक्स प्रकारात भर लावा
महत्त्वाची सूचना:-विनाकारण फवारणी व खत देणं टाळा गरज असेल तरच फवारणी घ्या.. नियोजन बद्ध खत शेड्युल ठेवा जेणेकरून पिकाची वाढ एकसारखी राहील.. उलट सुलट फवारणी टाळा हे पिकासाठी खूप धोकादायक आहे.. उत्पादन खर्च निघण्याचा पण प्राब्लेम होऊ शकतो..
कीटकनाशके+बुरशीनाशकांची फवारणी प्रत्येक 5 दिवसानी करा.. म्हणजे 1 तारखेला फवारणी केल्यास 5 तारखेला दुसरा स्प्रे घ्या.. कीड व रोगाचा प्रकार पाहून औषध निवडा..याचा फायदा असा होईल की फवारणी ची संख्या कमी होईल व कीड रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.. खर्च कमी होईल..
ड्रीप खत देताना
2 दिवसानी अडाणी द्या
म्हणजे 1 तारखेला दिल्यास 4 तारखेला द्या..म्हणजे पाहिले दिलेले खत संपूर्ण लागते.. वाया जात नाही..खत कमी लागते.. खर्च कमी होतो..
विनाकारण स्प्रे व खत दिल्यास प्लॉट लवकर वाया जातो..
विनामल्चिंग टोमॅटो व्यवस्था पण संपुर्ण व्हिडिओ खलील लिंक वर आहेत ..
विना मल्चिंग टोमॅटो लागवड: https://www.youtube.com/playlist?list=PLKJ00E7ki312rza9NFYTb7-geeYti6XBD
ते पाहू शकता..
21 ते 30 दिवसाचे नियोजन खालील प्रमाणे👇
21 दिवस ड्रीप
कार्बन प्लस किंवा सी बॉन 1 लिटर एकरी
21वा दिवस फवारणी
इंट्रा प्रिड(टेलटोपायराईड 15 टक्के) 1.5 मिली+ बायो303 1.5 मिली + चिलेटेड माईक्रोन्यूट्रीअंट 1ग्राम प्रति लिटर
23 दिवस ड्रीप
12.61.00 5 किलो एकरी
23 दिवस फवारणी
लिक्विड कॅल्शियम 2 मिली+बोरॉन 1 ग्राम/लिटर
24वा दिवस ड्रीप
मॅग्नेशियम नायट्रेट 4 किलो + बोरॉन 250ग्राम (फवारणी मध्ये बोरॉन घेतले असल्यास ड्रीप ने देण्याची गरज नाही)
25 दिवस फवारणी
लंमडायलोथ्रीन 5 टक्के 2 मिली +इमिडा 17.8 टक्के 1 मिली+इंफिनिटो 2 मिली/लिटर पाणी
28 दिवस ड्रीप
12.61.00 5 किलो एकरी
29 दिवस फवारणी
असेंटमा प्रिड 1 ग्राम+फिप्रोनील 5 टक्के 2 मिली+ रेडोमिल गोल्ड (मॅटोलेझील+मेनकोझेब) 2 ग्राम/लिटर
पुढील व्यवस्थापण साठी खालील लिंक खालील लिंक वर क्लिक करा
विना मल्चिंग टोमॅटो लागवड: https://www.youtube.com/playlist?list=PLKJ00E7ki312rza9NFYTb7-geeYti6XBD
#विनामल्चिंग_टोमॅटो_लागवड
*🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे*
*शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...*
*माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇*
8605555382 फक्त व्हॉटअप
*किंवा*
🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
*किंवा*
*📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा.* शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 https://youtube.com/c/शेतीचाडॉक्टर
*चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..*
काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
*👨🏻⚕️माफक फीस मध्ये शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल..*