#patilsopinion
#shivajimaharajhistroy
जय शिवराय...
वार्धक्याकडे झुकलेला औरंगजेब बिछायतीला टेकला होता. आपल्या आयुष्यातील शेवटच्या काही दिवसांमध्ये तो खूप विचार मग्न राहत होता. त्याला त्याचा भविष्यकाळ आठवत होता. स्वतः बादशहा बनण्यासाठी त्याने कित्येक जणांचे प्राण घेतले होते. त्याचा मोठा भाऊ दारासिकोह आणि त्याचा मुलगा यांचे हाल हाल करून मारून टाकले. स्वतःच्या बापाला व स्वतःच्या मुलीला कैदेत ठेवले. ते कैदेत असतानाच दोघांचाही मृत्यू झाला.
संपूर्ण हिंदुस्थानावर आपलंच साम्राज्य असावं अशी त्याची महत्त्वकांक्षा होती. त्यामुळे त्याने निजामशाहीचा सहज अंत केला. आदिलशाही आणि कुतुबशाही त्याला घाबरूनच होते. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य त्याच्या डोळ्यात सलत होतं. त्याने शहाजीराजांचा पराक्रम पाहिला होता, शिवाजी महाराजांनी केलेला अपमान त्यांनी पचवला, संभाजी महाराजांनी तर त्याला नऊ वर्ष सडोकी पडो करून सोडलं होतं.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्याला वाटले की, स्वराज्य आता आपलेच..! पण तेही स्वप्न त्याचे भंग पावले. कारण संभाजी महाराजांचा भाऊ राजाराम गादीवर आले, आणि औरंगजेबाला स्वराज्यात पाय ठेवणे कठिण झाले. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर तर त्याला पूर्ण खात्री होती की स्वराज्य आपल्याच घशात येणार.. पण इथेही निराशाच त्याच्या पदरात पडली.
उत्तर भारतातील आपलं एवढं मोठं साम्राज्य सोडून तो मराठ्यांचा पराभव करण्यासाठी दख्खनेत आला. सह्याद्रीच्या दऱ्यानखोऱ्यांमध्ये राहू लागला.
तरीही मराठ्यांनी त्याच्यापुढे कधीही गुडघे टेकले नाही.
हे सर्व त्याला आठवत होतं आणि तो आणखी चिंतातूर होत होता.
म्हातारपणामध्ये त्याची मुलगी झीनतुननिसा सेवा करत होती. पाहता पाहता ती आता 63 वर्षाची झाली होती. आपलाही संसार असावा असा तिने अजिबात विचार न करता निरंतर औरंगजेबाची सेवाच करत राहिली.
आपण आपल्या संपूर्ण हयातीमध्ये आपल्या मुलीचे लग्न करू शकलो नाही ही खंत औरंगजेबाला सतावत होती.
स्वराज्य जिंकण्याच्या नादात त्याच्या आयुष्यातील 26 वर्ष असेच निघून गेले होते. हा विचार करता करताच त्याच्या छातीत कळ निघाली आणि त्याने अखेरचा श्वास सोडला.
अशाप्रकारे औरंगजेबाच्या जीवनातील हा प्रसंग सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे.
#shivajimaharajhistroy
#sambhajimaharajhistory
#shivajimaharajsong
#marathawarrior
#history
#aurangzeb
#aurangzebalamgir