#Devgad #devgadbeach #devgadfort #zipline #adventureactivities #alphansomango #alphanso #mithmumbaribeach #kunkeshwartemple #kunkeshwar #seabeach #lighthouse #fort #konkan
हापूस आंब्यासाठी जगभरात प्रसिध्द झालेले देवगड अत्यंत देखणे आहे. समुद्रच्या काठाला देवगड किल्लयाचे अवशेष अजूनही मनमोहक आहेत. समुद्रकिना-याला उंच टेकडीवर पवनचक्क्या उभारल्या आहेत. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूला समुद्र असा देवगडचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर आहे. देवगड बंदरामध्ये मासेमारीच्या असंख्य बोटी नांगरलेल्या असतात. पूर्वी देवगड हे किनारपट्टीवरचे गजबजलेले बंदर होते. हे नैसर्गिक बंदर असल्याने अनेक मोठमोठया बोटी थेट किना-यापर्यंत येऊन लागत. देवगड किल्ला आनंदवाडी बंदराच्या मागील डोंगरावर वसला आहे. तटबंदी अजूनही ब-यापैकी शाबूत असून आत दीपगृह आहे. किल्ल्यामध्ये वाहन जाऊ शकेल अशी सोय आहे. सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात हा भाग आहे.
दोन टेकडयांमधील देवगडच्या किना-या पलीकडच्या डोंगरावर समुद्रपक्ष्यांचे थवेच्या थवे विसावलेले असतात.
देवगड परिसरात सर्वत्र आंब्याच्या बागा दिसतात.अत्यंत कष्टाने त्या उभ्या केल्या आहेत.
इथले विमलेश्वराचे, रामेश्वराचे आणि पोखरबावचे मंदिरे प्रसिध्द आहेत.शाकाहारी-मांसाहारी असे दोन्ही पर्याय असणारी उत्तम होटल्स इथं आहेत.देवगडची ही हापूस आंब्यापलीकडची बाजू दाखवण्याचा प्रयत्न मी येत्या तिन भागातून करणार आहे.... आजच्या पहिल्या भागात देवगड किल्ला, दिपग्रूह, देवगड बिच,झिपलाईन,मिठमुंबरी बिच आणि कुणकेश्वरला भेट देऊन सुग्रास अशा शाकाहारी थाळीवर ताव मारणार आहे...तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक,शेअर करा आणि चॅनेल सब्सक्राइब करायला विसरू नका 😊🙏
निसर्ग हॉलीडे होम - गणेश राणे
9356276869
Please visit my social media platforms -
Instagram :
https://instagram.com/sushant4875?igshid=YmMyMTA2M2Y=
Facebook :
https://www.facebook.com/profile.php?id=100087560847719
Threads :
https://www.threads.net/@sushant4875