#BolBhidu #ImagicaThemePark #ImagicaKhopoli
प्रत्येकाच्या शाळेच्या आठवणीत सहलीची एखादी आठवण हमखास असतेच. सहल म्हणजे सगळ्याच शाळकरी मुलांसाठी आनंदाचा विषय. पण हाच आनंद आणि शाळेची सहल एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. नवी मुंबईतील एका महापालिकेच्या शाळेची सहल ऍडव्हेंचर पार्कला गेली होती. या सहलीदरम्यान संध्याकाळी साडेपाच वाजता आयुष सिंग या आठवीतल्या विद्यार्थ्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. पण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. रखरखत्या उन्हात ऍडव्हेंचर पार्कमध्ये उष्माघाताने 13 वर्षीय आयुषचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. पण या सगळ्यानंतर आता या मृत्यूला कारणीभूत कोण हा प्रश्नही उपस्थित केला जातोय.
ही सहल घेऊन जाताना शासनानं शैक्षणिक सहल घेऊन जाण्यासाठी जे नियम सांगितले आहेत, त्या नियमांचं शाळेकडून पालन करण्यात आलं नाही असे आरोपही होतायत. शिवाय ऍडव्हेंचर पार्कला सहल घेऊन जाणं हे शासनाच्या कोणत्या नियमात बसतं, सहल ऍडव्हेंचर पार्कला का काढण्यात आली, असे सवाल आता शाळा प्रशासनाला केले जातायत. हे प्रकरण नक्की आहे काय, आयुष सोबत नक्की काय घडलं? या सहलीवरुन होणारे आरोप काय, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/