तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री अंतर्गत मौजे चिकासे या गावी श्री. विजय शंकर चौधरी यांच्या शेतावर तालुका कृषी अधिकारी, साक्री श्री. योगेश सोनवणे यांनी केळी लागवडीसाठी कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमात सर्व शेतकरी MREGS अंतर्गत फळबाग लागवडीसाठी केळी या फळबागास अनुदान काढून देऊ. अणि या गावचे मायक्रो क्लायमेट हे केळी या फळबाग लागवडीसाठी योग्य आहे. त्यामुळे चिकासे या शिवारात केळी लागवड करून उत्पादन मिळू शकते असे बरेच शेतकरी ना प्रशिक्षण घेऊन सांगण्यात आले होते. त्याचे फलित म्हणून श्री. विजय चौधरी व बऱ्याच शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आणि त्यांचे उत्पादन सुद्धा खूप आले त्यांची केळीही दुबई येथे निर्यात झाली. त्याचा हा मुलाखतीचा व्हिडिओ.